एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana Maharashtra : लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता मिळण्याची तारीख ठरली, 'या' दिवशी 1500 रुपये खात्यावर जमा होणार 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी 3,690 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. 

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे. या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, "26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 3,690 कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत."

आदिती तटकरे म्हणाल्या की, "आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही 2 कोटी 46 लाख महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. ड्युप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही. थोड्याफार कमी होतील."

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला? 

* वय 21 ते 60 वर्षे
* दरमहा 1500 रुपये मिळणार
* दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
* अंमलबजावणी : जुलै 2024 पासून 

कोण असणार पात्र?

* महाराष्ट्र रहिवासी 
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

अपात्र कोण असेल?

* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Kalyan Dombivli Water Cut: केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2026 | बुधवार
Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Dombivli Water Cut: केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
Nashik Crime: 'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Embed widget