(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baramati : बारामती ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा, सोमेश्वर साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग
School : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसतोड मजुरांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी कोपीवरची शाळा सुरू केली आहे.
बारामती: कोपीवरची शाळा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सुरू केली आहे. त्याच कारण आहे जेव्हा साखर कारखाने सुरू होतात, तेव्हा राज्यातील विविध भागांतील ऊसतोड मजूर कारखान्यावर ऊस तोड करण्यासाठी येतात. मजुरांसोबत सोबत त्यांची मुले देखील येतात. त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. यावर पर्याय म्हणून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने लहान मुलांच्या शिक्षणासाठी कोपीवरची शाळा सुरू केली आहे.
सध्या या शाळेत 273 मुले शिकत आहेत. ही शाळा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या भागात सात ठिकाणी सुरू आहे. मुलांना शिक्षणापासून वंचित राहायला लागू नये हा यामागचा उद्देश आहे. गळीत हंगामात जेव्हा ऊसतोड मजूर राज्याच्या विविध भागातून उसतोडीसाठी जात असतात तेव्हा त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या मुलांना शिक्षणापासून वंचित राहायला लागू नये म्हणून बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली आहे.
सन 2017 ते 2021 या पाच वर्षात सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात ‘आशा’ प्रकल्प सुरू झाला होता. त्याअंतर्गत पाच वर्ष ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाची सोय करून देण्यात आली होती. परंतु संबंधित संस्थेचा करार संपल्याने हे काम थांबले होते. यानंतर चालू साखर हंगामात मजुरांच्या मुलांचे शिक्षण थांबणार होते. परंतु कारखाना आणि सामाजिक संस्थेच्या सहाय्याने कोपीवरची शाळा सुरू केली. ही शाळा सोमेश्वर कारखाना क्षेत्रात विविध सात ठिकाणी भरते ज्याची पट संख्या ही एकूण 273 इतकी आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार त्यांना शिक्षण दिले जाते. या शाळेत सध्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी शिकत आहेत.
दिवसभर ही मुले त्यांच्या आई-वडिलांसोबत ऊसतोड मजुरी करायला जातात आणि संध्याकाळी शाळेत येऊन बसतात. या शाळेची वेळ ही संध्याकाळी 5 ते 9 पर्यत असते. यात विविध प्रकारचे शिक्षण मुलांना दिले जाते. या भरलेल्या शाळेमुळे पालकांच्या तोंडावर समाधानाचे चित्र आहे.
चालू वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या शेजारच्या जागेतील कोपीवर ही शाळा भरली आहे. पुढच्या वर्षीपासून ही शाळा कारखाना परीक्षेत्रातील सर्व कोपीवर शाळा भरणार असल्याची माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली आहे. कोपीवरची शाळा ही सध्या विविध अंगाने चर्चेचा विषय बनली आहे. ही शाळा शाळेपासून वंचित असणाऱ्या मुलांसाठी वरदान ठरते आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha