एक्स्प्लोर

Konkan Refinery : कोकणातील रिफायनरीच्या दृष्टीनं 6 एप्रिलचा दिवस महत्त्वाचा! 'या' गावची ग्रामसभा निर्णायक

Konkan Refinery Latest News Updates : सध्या कोकणातील रिफायनरीवरून सुरू असलेला वादंग आणि धोपेश्वर रिफायनरी असं नवीन नामकरण झाल्यानं या गावच्या ग्रामसभेकडे लक्ष लागून राहिलं आहे.

Konkan Refinery Latest News Updates barsu village Gramsabha: कोकणातील रिफायनरी बारसू गावात होणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात बारसू गावचा उल्लेख केला आहे. तर, धोपेश्वर ग्रीन रिफायनरी असं या रिफायनरीचं नामकरण आता केलं गेलं आहे. दरम्यान, याच गावची ग्रामसभा आता 6 एप्रिल रोजी आयोजित केली गेली आहे. या सभेमध्ये रिफानरीबाबत ठराव देखील केला जाणार आहे. त्यामुळे धोपेश्वर गावच्या लोकांचं मत नेमकं काय आहे? याचा किमान अंदाज बांधणं शक्य होणार आहे. जवळपास 5 हजार एकर जागा ही धोपेश्वर गावची असल्याचा दावा केला जात आहे. त्यामध्ये बारसू, पन्हळे ही महसुली गावं देखील आहेत. मुख्य बाब म्हणजे धोपेश्वर गावच्या ग्रामसभेत केवळ मतदान कार्ड असलेल्या स्थानिकांनाच मतदान करता येणार आहे. त्यामुळे सध्या कोकणातील रिफायनरीवरून सुरू असलेला वादंग आणि धोपेश्वर रिफायनरी असं नवीन नामकरण झाल्यानं या गावच्या ग्रामसभेकडे लक्ष लागून राहिलं आहे. कोकणातील रिफायनरीला विरोध होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र देखील समोर आलं. त्यामध्ये बारसू गावचा उल्लेख करत रिफानरीसाठी 13 हजार एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच नाटे येथे 2144 एकर जागा ही क्रुड ऑईल टर्मिनलसाठी दिली जाईल असा उल्लेख केला आहे. त्यामुळे धोपेश्वर गावच्या या ग्रामसभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

नाणार ते धोपेश्वर रिफायनरी 

कोकणात रिफानरीच्या मुद्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. यापूर्वी नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी रद्द करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी असं देखील या रिफायनरीचं नामकरण केले गेलं. रिफायनरी समर्थकांकडून याबाबत मोर्चा काढला गेला. जमिनींच्या संमत्तीचे सातबारे देखील सादर केले गेले. पण, त्यानंतर देखील अपेक्षित असं काहीही साध्य झालं नाही. असा असताना मागील वर्षभरापासून राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगांवची चर्चा सुरू आहे. या ठिकाणी एमआयडीसी प्र्स्तावित असून त्या जागेवर रिफायनरी उभारावी अशी मागणी केली जात होती. पण, सध्या धोपेश्वर ग्रीन रिफायनरी असं या रिफायनरीचं नाव सध्या घेतलं जात आहे. धोपेश्वर हे केवळ राजापूरच नाही तर कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे. परिणामी कोकणातीर रिफायनरीचं नामकरण नाणार ते धोपेश्वर असं झालेलं आहे. 

विरोधाची किनार

कोकणातील नवीन जागी रिफायनरी करण्यास देखील विरोध आहे. याबाबत 30 मार्च रोजी राजापूर तहसील कार्यालय येथे विरोधकांनी मोर्चा काढला. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत रिफायनरिला विरोध दर्शवला गेला. त्यामुळे कोकणातील रिफायनरीला विरोध कि समर्थन याच्या चर्चा पुन्हा रंगल्या. 

शिवसेनेला होकार हवा केंद्राचा!

नाणार येथील ग्रीन रिफायनरी नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे रिफायनरीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राने कळवले आहे. प्रकल्पासाठी ती जागा योग्य असल्याचे केंद्राने कळवले तर, स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच प्रकल्प हवा की नको याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे म्हटले. काल अर्थात गुरूवारी दुपारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बारसू येथे प्रकल्पासाठी आवश्यक म्हणजे 10 ते 12 हजार एकर जागा उपलब्ध होऊ शकते. प्रकल्पासाठी ती योग्य आहे की नाही, हे तपासून केंद्र शासन कळवेल. सर्व जागेवर कातळ आहे. तेथे घरे किंवा मोठ्या प्रमाणात बागा नाहीत. त्यामुळे कोणीही विस्थापित होण्याचा प्रश्न असे देखील सामंत म्हणाले. या भागात ही ग्रीन रिफायनरी होणार आहे. तेथील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्या आहेत. त्यामध्ये अनेक उद्योजकांसह, लोकप्रतिनधींची नावे असल्याचे बोलले जाते याकडे लक्ष वेधले असता सात-बारा तपासून बघा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे उत्तर सामंत यांनी दिले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Madha : माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Varsha Gaikwad : धारावीत वर्षा गायकवाड, अनिल देसाईंचा एकत्र प्रचार; ठाकरे-काँग्रेसमधले वाद मिटलेSouth Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रहीDeepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूकAaditya Thackeray Vs Devendra Fadnavis : सत्तेसाठी विचार सोडणाऱ्यांनी बोलू नये : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Madha : माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
Pushkar Shrotri : पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
ऋषभ पंतकडून विराट कोहलीला टक्कर, विश्वचषकासाठी दावाही ठोकला
ऋषभ पंतकडून विराट कोहलीला टक्कर, विश्वचषकासाठी दावाही ठोकला
मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
मोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
OTT Movies : ओटीटीवर हॉरर धमाका! स्वत:च्या सावलीलाही घाबराल, अशा सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची मेजवानी
ओटीटीवर हॉरर धमाका! स्वत:च्या सावलीलाही घाबराल, अशा सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची मेजवानी
Embed widget