एक्स्प्लोर
Advertisement
नि. पोलिसाची आत्महत्या घर मालकिणीला अद्दल घडवण्यासाठी?
कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील विश्वकर्मा कॉम्प्लेक्समध्ये रविवारी रात्री घडलेली घटना सोमवारी उघडकीस आली.
कोल्हापूर: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पत्नीची हत्या करुन, स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर, आता त्याबाबतचं कारण उघड झालं आहे.
घर मालकीणीच्या तगाद्यामुळे आपण हे कृत्य करत असल्याची चिठ्ठी मयत बबन बोबडे यांनी लिहून ठेवली आहे. कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील विश्वकर्मा कॉम्प्लेक्समध्ये रविवारी रात्री घडलेली घटना सोमवारी उघडकीस आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
निवृत्त पोलीस अधिकारी बबन पांडुरंग बोबडे आणि रेखा बोबडे हे वृद्ध दाम्पत्य गेली वर्षभर राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील पाचव्या मजल्यावर भाड्याने राहत होते. मनिषा घोटगे यांनी तो फ्लॅट बोबडे दाम्पत्याला भाड्याने दिला होता.
बबन बोबडे यांनी रविवारी रात्री त्यांची पत्नी रेखाच्या डोक्यात स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळी घालून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःच्या डोक्यात त्याच रिव्हॉल्वरने गोळी घालून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी आत्महत्येचे कारण लिहून ठेवले आहे.
गेल्या 6 महिन्यांपासून फ्लॅट रिकामा करण्यावरुन मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद सुरू होता. या वादावादीमुळे आपल्या पत्नीची ताबियात बिघडली आहे. यामुळे आपण व्यथित झालो असून आपण हे कृत्य करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.
केवळ घरमलकिणीला अद्दल घडवण्यासाठी बबन बोबडे यांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे त्यांनी आणखीन 5 चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत, त्यामध्ये पेपरचे बिल, मोलकरणीचा पगार, या आणि इतर गोष्टींची माहिती लिहून ठेवली आहे. रात्री उशिरा बबन बोबडे यांनी झोपलेल्या पत्नीचा खून करून स्वत:ही डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.
हे कृत्य केल्याची माहिती शेजाऱ्यांनाही नव्हती, दुपारी त्यांचे नातेवाईक घरी आल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
या घटनेची माहिती मिळताच राजवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी फ्लॅट मालक मनिषा घोटगे यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
बबन बोबडे हे 8 वर्षापूर्वी मुंबई येथून सेवा निवृत्त झाले होते. त्यांना २ मुले आहेत. त्यापैकी एक संतोष हा एअर फोर्समध्ये तर दुसरा सचिन हा हॉटेलमध्ये कुक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement