एक्स्प्लोर
कोल्हापूर महापालिका महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांची निवड
सूरमंजिरी लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर ठरल्या आहेत. लाटकर यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटके यांचा 11 मतांनी पराभव केला. लाटकर यांना 43 मते तर शेटके यांना 32 मते मिळाली. दरम्यान महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीवेळी शिवसेनेच्या चार नगसेवकांची अनुपस्थिती होती.
कोल्हापूर : सत्तास्थापनेचा पेच राज्यात कायम असताना महाशिवआघाडीने कोल्हापूरात पहिला विजय मिळवला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची निवड कऱण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे संजय मोहिते यांची निवड कऱण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर लाटकर समर्थकांनी एकच जल्लोष केला.
सूरमंजिरी लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर ठरल्या आहेत. लाटकर यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटके यांचा 11 मतांनी पराभव केला. लाटकर यांना 43 मते तर शेटके यांना 32 मते मिळाली. दरम्यान महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीवेळी शिवसेनेच्या चार नगसेवकांची अनुपस्थिती होती. कोल्हापुरात गेल्या चार वर्षांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. तर दुसऱ्या बाजूला उपमहापौरपदी काँग्रेसच्या संजय मोहिते यांचे निवड झाली आहे. मोहिते यांना भाजपच्या कमलाकर भोपळे यांचा पराभव केला.
Kolhapur Mayor | कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर | कोल्हापूर | ABP Majha
लाटकर यांना केवळ दीड महिने महापौरपदाचा कार्यकाल मिळणार आहे. त्यामुळे दीड महिन्यात नेमकी कोणती काम करणार हा प्रश्न उपस्थित होतो. दीड महिन्यांमध्ये आपल्याला खूप कामं करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर लाटकर यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement