एक्स्प्लोर
कोल्हापुरात पंधरवड्यात 17 घरफोड्या, एकाच इमारतीत 5 चोऱ्या
![कोल्हापुरात पंधरवड्यात 17 घरफोड्या, एकाच इमारतीत 5 चोऱ्या Kolhapur Gang Of Thieves Looting Flats In The City कोल्हापुरात पंधरवड्यात 17 घरफोड्या, एकाच इमारतीत 5 चोऱ्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/04023118/Kolhapur-chori-collage-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एकाच अपार्टमेन्टमध्ये भरदिवसा 5 घरफोड्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 12 दिवसांतील एकूण घरफोड्यांचा आकडा 17 वर पोहचला आहे.
निर्माण चौकातील ओअॅसिस अपार्टमेन्टमध्ये तब्बल 5 फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. बंद फ्लॅट हेरुन, इमारतीत सीसीटीव्ही आणि वॉचमन नसल्याची रेकी करुन चोऱ्या करणाऱ्या या टोळीने पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या या चोरट्यांचा सध्या शोध सुरु आहे.
घरफोड्या टोळीचं धाडस तर इतकं की एकाच अपार्टमेंटमध्ये ते किमान 5 ते 6 फ्लॅट फोडतात. दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्यानं नागरिक हैराण झाले आहे.
या टोळीची नागरिकांमध्ये चांगलीच दहशत परसली असताना पोलिस मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)