एक्स्प्लोर

Kolhapur District Bank Election Result LIVE: कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Kolhapur District Bank Election Result LIVE: कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

LIVE

Key Events
Kolhapur District Bank Election Result LIVE:   कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल,  सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Background

Kolhapur District Bank Election Result LIVE: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.  ही जिल्हा बँक विरोधकांच्या हातात जाते की पुन्हा सत्ताधारी आपलं वर्चस्व कायम राखतात हे आज स्पष्ट होणार आहे...सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ करत आहेत तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश अबिटकर करत आहेत...21 पैकी 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत... त्यामुळे 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत... बुधवारी जिल्हा बँकेसाठी तब्बल 98 टक्के मतदान झाले आहे... जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता मात्र शिवसेनेला देऊ केलेल्या दोन जागा त्यांना मान्य नव्हत्या. त्यामुळे शिवसेनेनं इतर छोट्या छोट्या घटकांना सोबत घेऊन पॅनल बनवले..तर सत्ताधारी पॅनलकडून राक्षसी वृत्तीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक लागल्याचा आरोप करण्यात आला...आता महाविकास आघाडीतील तीन पक्ष या निवडणुकीत फुटले आहेत...त्यामुळे निकाल काय लागतो याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय...

14:58 PM (IST)  •  07 Jan 2022

जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर

जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर

आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केली उघड नाराजी

सत्तारूढ गटातील नेते प्रामाणिक राहिले असते तर विरोधी गटातील एकही जागा निवडणून आली नसती - कोरे

बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा विजय विनय कोरे यांच्या जिव्हारी 

सर्वजण एकत्र यावे अशी अपेक्षा होती; मात्र माझ्या अपेक्षांना विश्वासघाताने सुरुंग लावला 

ज्यांनी हे विश्वासघाताचे पाप केले त्यांना त्याची योग्य वेळी किंमत मोजावी लागले

विनय कोरे यांचा सत्ताधारी गटातील नेत्यांना इशारा

12:37 PM (IST)  •  07 Jan 2022

कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व

कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. मात्र ऐन वेळी तयार केलेल्या शिवसेनेच्या पॅनेलनं सत्ताधारी  पॅनेलला घाम फोडला आहे. सध्या शिवसेना गटाचे तीन उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार सेनेच्या बाजूचे झाले आहेत. तर सत्ताधारी गटाचे 11 उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीआधीच सहा जण बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर राहील असा दावा संजय मंडलिक यांनी केला आहे. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. आमदार प्रकाश आवडे त्याच बरोबर काही विद्यमान संचालक देखील पराभूत झालेत. या निवडणुकीत अबिटकर बंधूंवर जोरदार टीका झाली. यांच्यामुळेच निवडणूक लागली अशी सत्ताधारी गटाने टीका केली होती. मात्र आपण उमेदवारीसाठी पात्र होतो हे अर्जुन अबिटकर यांनी दाखवून दिलं.

11:51 AM (IST)  •  07 Jan 2022

निकालानंतर जल्लोष सुरु, अंतिम निकाल यायला वेळ

11:50 AM (IST)  •  07 Jan 2022

शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून  सत्ताधारी गटाचे भैया माने विजयी 

 शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून  सत्ताधारी गटाचे भैया माने विजयी 

विरोधी आघाडीच्या क्रांतिसिंह पाटील यांचा केला पराभव

भैय्या माने यांना 2266 तर पाटील यांनी 1655 मत

611 मताधिक्याने विजय

11:49 AM (IST)  •  07 Jan 2022

विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक, अर्जुन अबिटकर, बाबासाहेब पाटील आसुरलेकर आणि रणवीर गायकवाड विजयी

आतापर्यंतच्या निकालात सत्ताधारी गटातील 5 उमेदवार विजयी

तर विरोधी गटातील 4 उमेदवारी विजयी

विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक, अर्जुन अबिटकर, बाबासाहेब पाटील आसुरलेकर आणि रणवीर गायकवाड विजयी

सत्ताधारी गटातील राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणजित पाटील, संतोष पाटील विजयी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget