एक्स्प्लोर

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला, भाविकांची मागणी

पाच ठिकाणी भंगलेल्या देवीची मूर्तीवर मस्तकाभिषेक गेली तेरा वर्षे घातलेला नाही. ही मूर्ती अभिषेक, आंघोळ यापासून दूर असल्याने 'पारोशी' अशीच राहिलेली आहे.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती बदलण्यात यावी, अशी मागणी अंबाबाईच्या काही भक्तांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मूर्ती बदलण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलं आहे. अंबाबाईची मूर्ती पाच ठिकाणी भंगली आहे. तसंच गेली 12 वर्षे देवीला मस्तकाभिषेक घालण्यात आलेला नाही. त्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे भंगलेली मूर्ती त्वरित बदलून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जावी, अशी मागणी या भक्तांनी केला आहे. अंबाबाई देवीचे 1917 पासून आजपर्यंत शंभर वर्षात पाच ठिकाणी भंगलेले मूर्तीचे फोटो उपलब्ध आहेत. खरंतर मूर्तीची अवस्था पाहावत नाही. 2016 मध्ये मूर्तीचे संवर्धन केलं. त्यावेळी संवर्धन प्रक्रिया केली तरी मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणात झाल्याने संवर्धनाची गॅरंटी देता येत नाही, असे पुरातत्त्व खात्याने जाहीर केलं होतं. यावेळी देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं होतं. तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी हे चित्रीकरण पाहिल्यानंतर हे चित्रीकरण म्हणजे 'जिवंत बॉम्ब' आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र हे चित्रीकरण भक्तांसमोर आणण्यात आलेलं नाही. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यातील मूळ मूर्तीची नित्य पूजा म्हणजे अभिषेक स्नान, आरती, मंत्रपठण झालंच पाहिजे. श्री अंबाबाईचे स्थान जागृत आहे. ते जागृत ठेवण्यासाठी या सर्व प्रक्रिया नित्यनियमाने होणे गरजेचं असतं. पाच ठिकाणी भंगलेल्या देवीची मूर्तीवर मस्तकाभिषेक गेली तेरा वर्षे घातलेला नाही. ही मूर्ती अभिषेक, आंघोळ यापासून दूर असल्याने 'पारोशी' अशीच राहिलेली आहे. देवदेवतांचे देवत्व अबाधित राखण्यासाठी या सर्व प्रक्रिया नित्यनेमाने होत नाहीत, याची कल्पना असूनही याकडे प्रशासन आणि पुजारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भक्तांनी केलेला आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक संपूर्ण देशातून कोल्हापुरात दाखल होत असतात. तिरुपती, शिर्डीच्या साई मंदिराप्रमाणेच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ही देवीचा मस्तकाभिषेक भाविकांना पाहता यावा अशी मागणी भक्तांकडून होती. 2014 सली भंगलेली मूर्ती बदलण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं. मात्र मधल्या काळात मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन सुरु झालं, यासह विविध आंदोलनांमुळे मूर्ती बदलाची मुख्य मागणी बाजूला पडली. यासंदर्भात श्रीपूजक आणि देवस्थाने पुढाकार घेतला तर देवीची भंगलेली मूर्ती बदलून त्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होऊ शकते. मात्र हा विषय भावनिक असल्यामुळे या विषयात हात घालण्यासाठी कोणीही तयार होताना दिसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget