एक्स्प्लोर
कपडे वाळत घालताना विजेचा शॉक, कोल्हापुरात दाम्पत्याचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापुरात विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपडे वाळत घालताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील दानोळी गावात ही घटना घडली. अंजना घाडगे या तारेवर कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी शेजारच्या तारेतील विद्युत प्रवाह कपडे वाळत घातलेल्या तारेत उतरला आणि त्यांना विजेचा धक्का बसला.
पत्नीच्या मदतीला धावलेले बाळू घाडगे यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेत दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement