एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मशानात दिवाळसण, कर्मचाऱ्यांचं करवीरवासियांकडून औक्षण
कोल्हापूर : जिथे फक्त चिता जळतात... जिथं फक्त आसवांचा पूर असतो... जिथं हुंदके असतात.. आज तिथे आशेचे दिवे लागले... कोल्हापुरातल्या स्मशानभूमीतील 5 कर्मचाऱ्यांचं कोल्हापूरकरांनी औक्षण केलं.
एरवी चितेच्या धगीत होरपळणाऱ्यांना अचानक मायेची उब मिळाल्यानं स्मशानातले कर्मचारीही गहिवरुन गेले. दिवस-रात्र, ऊनपाऊस याची तमा न बाळगता हे हात स्मशानात काम करतात. त्यामुळे त्यांचा दिवाळसण काहीसा उपेक्षितच असतो.
कोल्हापूरच्या स्मशानात दिवाळी साजरी करुन करवीरवासियांनी एकप्रकारे संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं. ही दिवाळी प्रत्येकामध्ये अशाच संवेदना निर्माण करणारी ठरो, हीच प्रार्थना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement