एक्स्प्लोर
हद्दवाढीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर, कडकडीत बंद, रिक्षा फोडली
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं आहे. रॅलीत सहभागी असलेल्या जमावाने तीन रिक्षा फोडल्या आहेत.
कोल्हापूर शहरात आज हद्दवाढीच्या समर्थनासाठी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि इतर सर्व व्यवहार ठप्प बंद करण्यात आले आहेत. रिक्षा आणि केएमटी बसनेही या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.
शिवाजी चौकात हद्दवाढ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
महापालिकेच्या हद्दवाढ कृती समितीची काल बैठक झाली त्यात शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रस्तावानुसार, 18 गावं आणि दोन्ही औद्योगिक वसाहतींसह हद्दवाढ व्हावी अशी मागणी आहे. या मागणीसाठी महापौर अश्विनी रामाणे यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
महापौर रामाणे यांनी हद्दवाढीसाठीला विरोध करणार्या तीन आमदारांचा निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हद्दवाढीसाठी सकारात्मक आहेत. मात्र काही आमदार मात्र हद्दवाढीच्या विरोधात आहेत. त्यामुळे आजचा दिवस कोल्हापूर बंद राहणार आहे.
हद्दवाढीला शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, सुजीत मिणचेकर, भाजप आमदार अमल महाडिक यांचा विरोध आहे. तर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे मात्र हद्दवाढीच्या बाजूने आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement