एक्स्प्लोर

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका... काय बंद राहणार? 

Bharat Bandh On 9th July : केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणं आखली जात असून त्यामुळे कामगार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा दिली आहे. बुधवारी होणाऱ्या या बंदमध्ये देशभरातील 25 कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचसोबत या संघटनांच्या संबंधित इतर कामगार संघटनांही त्यामध्ये भाग घेणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी  धोरण अवलंबल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. 

Services Closed During Bharat Bandh : भारत बंदमध्ये काय बंद राहील?

  • बँकिंग सेवा
  • विमा कंपन्यांचे काम
  • पोस्ट ऑफिस
  • कोळसा खाणींचे काम
  • राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)
  • महामार्ग आणि रस्ते बांधकाम
  • सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन.

Services Open During Bharat Bandh : काय सुरू राहील?

  • बहुतेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे काम सुरू असेल.
  • रुग्णालये, वैद्यकीय आपत्कालीन सेवा सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.
  • खाजगी शाळा/महाविद्यालये आणि ऑनलाइन सेवा.

बुधवारी, 9 जुलै रोजी होणाऱ्या बंदमध्ये देशातील शहरी भागांसह ग्रामीण भागांतील कामगारही सहभागी होणार असल्याचं कामगार संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. देशव्यापी संपादरम्यान अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहू शकतात. त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरती होण्याची शक्यता आहे.

Why Bharat Bandh On 9th July : बंद का पुकारण्यात आला?

कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया याच्याकडे 17 प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती. पण केंद्र सरकारकडून त्याला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. त्याचमुळे 9 जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचं कामगार संघटनांनी म्हटलं आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या 10 वर्षांपासून घेण्यात आली नाही. त्याचवेळी सरकारने चार कामगार कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
Embed widget