एक्स्प्लोर

Kirit Somaiya : घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणाऱ्या ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही : किरीट सोमय्या

पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कराडमध्ये उतरले. कराडमध्ये किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.  

कराड : हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं, असंही ते म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असं ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असंही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले. 

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये उतरले. कराडमध्ये किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान सोमय्या यांच्या आरोपानंतर आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ देखील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा अन् राजकीय नाट्य, कराडमधून सोमय्या पोलिसांच्या ताब्यात

हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत सोमय्या यांनी या कारखान्यात  मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.

सोमय्या म्हणाले की,  ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही, याविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार आहे. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, बोगस ऑर्डर दाखवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. अद्यापही आदेशात नक्की काय लिहिलंय याविषयी आपणाला नीट कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे आपणाला मुंबईबाहेर जाता येणार नाही, अशी माहिती मला पोलिसांनी दिली. ते हेही म्हणाले की तुमच्यावर गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो. जर असं होतं तर मग तुम्ही माझ्या सुरक्षा यंत्रणेला याविषयीची माहिती का दिली नाही? असा सवालही सोमय्या यांनी केला.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरीही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. 

कराडमध्ये पोलिसांनी अडवल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले... 

किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकार एवढं घाबरलंय मला की, आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली आहे. माझं भांडण प्रशासन किंवा पोलिसांसोबत नाही. त्यांनी मला सांगितलं आहे की, कराड पोलीस स्टेशनला उतरावं. मी तशापद्धतीनं उतरणार आहे. मी कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. आज त्यांनी मला थांबवलं, मी दोन दिवसांनी पुन्हा येणार." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी घोटाळे समोर आणतोय, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्यानं येण्याची काहीही गरज नाही."

किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यानं दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती. 

सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन हायव्होल्टेज ड्रामा

दरम्यान, काल रात्रीपासून हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केलं की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते इथं मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचं स्वागत करणार आहे. त्यामुळं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथं दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खेड- शिवापूरमध्ये  'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता  25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
Sandeep Naik from Belapur: वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
Balasaheb Thorat: मविआत जागावाटपावरुन तणाव, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
मविआता तणाव, काँग्रेसने अनुभवी नेत्याला चर्चेसाठी पुढे केलं, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावाBalasaheb Thorat Full PC : बहुतांश जागांवर मार्ग निघालाय; थोड्यात जागांचा प्रश्न बाकी - थोरातABP Majha Headlines :  12 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Vidhansabha Election 2024 : नागपूर निवडणूक यंत्रणा सज्ज; भरारी पथकं तयार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खेड- शिवापूरमध्ये  'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता  25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
Sandeep Naik from Belapur: वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
Balasaheb Thorat: मविआत जागावाटपावरुन तणाव, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
मविआता तणाव, काँग्रेसने अनुभवी नेत्याला चर्चेसाठी पुढे केलं, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले...
मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी
मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी
Atul Benke: अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
भाजपने सुलभा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता, कल्याण पूर्वमध्ये मित्रपक्ष आक्रमक
भाजपने सुलभा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता, कल्याण पूर्वमध्ये मित्रपक्ष आक्रमक
Crime News:'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
Embed widget