(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; 16 जूनला होणार पुढील सुनावणी
Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक्ट्रोसिटी गुन्ह्यातील जामीन अर्जावर न्यायालय 16 जून रोजी सुनावणी करणार आहे.
Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) अडचणीत वाढ झाली आहे. केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अॅक्ट्रोसिटी गुन्ह्यातील जामीन अर्जावर न्यायालय 16 जून रोजी सुनावणी करणार आहे.
पुढील सुनावणी 16 जूनला
केतकीवर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशीची मागणी केतकीच्या वकिलांनी राज्यपालांकडे केली आहे. तर पोस्टाद्वारे गुन्हा दाखल करण्याचा न्यायलाने सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आता 16 जूनला सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली आहे. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून ती सध्या कारागृहात आहे. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं आता उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला असून याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
संबंधित बातम्या