Corona Vaccination | नियम डावलून किती लाडक्यांचं लसीकरण केलं, केशव उपाध्ये यांचा ठाकरे सरकारला सवाल
केंद्र सरकारने राज्य सरकारला सुरवातीच्या काळात लसींचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला होता. परंतु राज्य सरकारने नियमानुसार लसीकरण न करता खास लोकांनाच लस दिली आहे

पंढरपूर : नियम डावलून किती लाडक्यांचं लसीकरण केलं, असा सवाल केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला सुरवातीच्या काळात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसींचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला होता. परंतु राज्य सरकारने नियमानुसार लसीकरण न करता खास लोकांनाच लस दिली आहे. त्यातच तीन लाख लसी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने 15 लाख लसींचा हिशोब द्यावा आणि आतापर्यंतच्या पुरवठा केलेल्या लसींची चौकशी करावी अशी मागणी ही भाजपचे प्रदेश प्रवक्ते केवश उपाध्याय यांनी शनिवारी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली.
सुरुवातीला फ्रंट लाईनवरच्या लोकांचे लसीकरण करणे आवश्यक होते. परंतु सरकारने नियम बाह्यपणे खास लोकांचे लसीकरण केले आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. शिवाय 3 लाख लसी राखीव ठेवल्याने सध्या राज्यात कृत्रिम लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
Pune Corona Vaccine: केंद्राकडून कोरोना लसींच्या बाबतीत पुण्याला विशेष ट्रीटमेंट, नेमकं सत्य काय?
राज्यात लसींचा तुटवडा जाणवू लागताच महाविकासआघाडी सरकारनं केंद्रावर निशाणा साधला. राज्य सरकारच्या याच भूमिकेवर निशाणा साधत, सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्रावर आरोप करत आहे म्हणत या निमित्ताने ठाकरे सरकारचा ढोंगीपणा समोर असल्याचंही केवश उपाध्याय यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील लसीचा तुटवडा, लसी कमी असल्याचं संकट हे महाविकास आघाडी सरकार निर्मित संकट आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून नेमक्या लसी कोणाला दिल्या? नियम, अटीत बसणाऱ्यांनाच दिल्या का? याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारने दिला पाहिजे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 10, 2021
- @keshavupadhye pic.twitter.com/S26FIOFuQL
राज्यापुढे कोरोनासोबतच लस तुटवड्याचंही संकट
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनांना कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते. मुंबईसह काही ठिकाणी लसीकरण मोहिम थांबली असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.























