एक्स्प्लोर
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या निवडणुका जाहीर
मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. या महापालिकांसाठी येत्या 24 मे (बुधवार) रोजी मतदान होणार आहे आणि 26 मे (शुक्रवार)रोजी मतमोजणी होईल.
तिन्हा महापालिकांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ही माहिती दिली.
भिवंडी माहापालिकेत 90 जागा असून मालेगाव महापालिकेत 84 जागा आहेत. तर पहिल्यांदा निवडणूक होणाऱ्या पनवेल महापालिकेत 78 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
अर्ज दाखल करण्याची तारीख : 29 एप्रिल ते 6 मे
अर्ज छाननी तारीख : 8 मे
चिन्ह वाटप : 12 मे
मतदानाची तारीख : 24 मे
मतमोजणी : 26 मे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement