कलाटेंनी दूर केले भाजपच्या मार्गातील 'काटे'
Pune Bypolls Results : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला नसता तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असता. पण कलाटेंनी भाजपच्या मार्गात येणारे काटे दूर केले.
Kasba, Chinchwad (Pune) Bypolls Results : कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सत्ताधारी आणि विरोधकांना एका एका जागांवर विजय मिळला आहे. कसबा काँग्रेसकडे गेले तर चिंचवडमध्ये भाजपने गड राखला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला नसता तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असता. पण कलाटेंनी भाजपच्या विजयाच्या मार्गात येणारे काटे दूर केले. त्यामुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला. जर कसब्याप्रमाणे दुरंगी लढत झाली असती, तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभव पाहावा लागला असता. स्वत: अजित पवार यांनी चिंचवडमधील पराभवानंतर मतं विभागल्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, अशी प्रतिक्रिया दिली.
चिंचवडमध्ये काय झालं?
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी विजय मिळवला. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अश्विनी जगताप यांच्याबद्दल सहानभुतीची लाट होती. पण महाविकास आघाडीने कंबर कसली होती. अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, नाना पटोले यासारखे नेते चिंचवडमध्ये उतरले होते. पण महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला. अश्विनी जगताप यांनी 36 हजार 168 मतांनी विजय मिळवला.
गणित कसे बिघडले ते पाहूयात.....
चिंचवडमध्ये तिरंगी लढत झाल्याचा भाजपला फायदा झाला.. राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. त्यांची महाविकास आघाडीकडून समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम होते. त्यातच त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाने पाठिंबा दिला... त्यामुळे राहुल कलाटे यांचा आत्मविश्वास अधिक वाढला.. पण प्रत्यक्षात त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.. भाजपच्या अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली. बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली. अश्विनी जगताप या 36 हजार 168 मतांच्या फरकाने विजयी झाल्या.
समजा, जर राहुल कलाटे उभे राहिले नसते तर दुरंगी लढत झाली असती...राहुल कलाटे आणि काटे यांच्या मतांची बेरीज केली तर अश्विनी जगताप यांच्या मतांपेक्षा जास्त होते.. नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली तर राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली... याची बेरीज केली तर एकूण मतांची संख्या एक लाख 44 हजार 547 इतकी होते.. ही मते अश्विनी जगताप यांच्या मतांपेक्षा जवळपास आठ हजार जास्त आहेत... राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. अजित पवार यांनी ही खंत बोलून दाखवली.. मते विभागली नसती तर कदाचीत निकाल वेगळा लागला असता, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. एकूणच काय तर कलाटेंनी भाजपच्या मार्गातील काटे दूर केले, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको...
कसब्यात दुरंगी लढत
कसब्यात भाजपच्या गडाला काँग्रेसने खिंडार पाडले. भाजपने जवळपास 28 वर्ष कसब्यात राज्य केले होते. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा 10 हजार 950 मतांनी पराभव केला. भाजपसाठी कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचारासाठी हजेरी लावली होती. पण रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडले. धंगेकर यांना 73194 मते मिळाली तर भाजपच्या रासने यांना 62244 मते मिळाली. कसब्यातील लढत दुरंगी झाली होती, इतर एकही नेता तितका ताकदीचा नव्हता. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये यांच्यात लढत थेट झाली... चिंचवडमध्ये बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला....