Pune Bypoll election : मतदार याद्यांमध्ये घोळ! मृत व्यक्ती मतदार यादीत अन् जिवंत व्यक्ती यादी बाहेर; मतदान न करतात पुणेकर माघारी
मृत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Pune Bypoll election : कसबा विधानसभा (Pune Bypoll Election)मतदार संघात तीन वाजेपर्यंत फक्त 20.05 टक्के मतदान पार पडलं आहे. त्यामळे या टक्केवारीतून पुणेकरांनी मतदानाला पाठ फिरवल्याचं पुढे आलं आहे. मृत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी निवडणुक आयोग जबाबदार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. सकाळपासून पुणेकरांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती मात्र काही वेळानंतर मतदानाकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. मतदार याद्या अपडेट केल्या तरीदेखील याद्यांमध्ये मृत व्यक्तीचे नाव मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच प्रमाणे जिवंत असलेल्या मतदारांची नावं यादीतून गायब आहेत. यातून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे.
मतदान न करताच घरी परतले पुणेकर...
अनेक पुणेकर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गेले होते मात्र त्याचं मतदार यादीत नावंच सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी अन्य काही मतदार केंद्रांवरदेखील मतदारांनी आपले नाव मतदार यादीच शोधले मात्र नाव सापडले नाहीत. त्यामुळे अनेक पुणेकरांना मतदान न करताच घरी परतावं लागलं. पुणे शहरात कसबा विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण 2 लाख 75हजार 679 इतके मतदान आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे.
मतदानाला थंडा प्रतिसाद...
कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पोटनिवडणुकीत कमी प्रमाणात मतदान होतं. दोन्ही मतदार संघात मतदानाला थंड प्रतिसाद मिळाला आहे. आकडेवारी बघितली तर पुणेकरांनी दोन्ही मतदार संघाच्या मतदानासाठी पाठ फिरवली आहे. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 या वेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 या वेळेत 20.68 तर 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 या वेळेत 18.50 तर 1 ते 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले आहे.