एक्स्प्लोर

एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 2020 मध्ये अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारने वर्ष 2022-23 चा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. 

 पुणे : कोरेगाव भीमा (Koregaon Bhima)  आणि एल्गार परिषद (Elgar Parishad) प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गाजलेल्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 2020 मध्ये अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारने वर्ष 2022-23 चा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. 

साहित्य, सामाजिक न्याय आणि सामाजिक सदभाव साठी काम करणाऱ्यांना कर्नाटक सरकारतर्फे दरवर्षी बसव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.  10 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते..आनंद तेलतुंबडे हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे ( पोलिसांसोबतच्या एन्काऊंटर मध्ये मृत्युमुखी पडलेले नक्षल कमांडर ) यांचे मोठे भाऊ आहेत. आनंद तेलतुंबडे यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये महत्वाचे पद भूषविले आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद मध्ये संशोधन कार्य ही केले आहे. आनंद तेलतुंबडे यांना बंगळुरू येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे 31 जानेवारी रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

 भीमा कोरेगाव प्रकरणी झाली होती अटक 

पुण्यात 31 डिसेंबर 2017 मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या हिंसाचाऱ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्याप्रकरणी एप्रिल 2020 मध्ये एनआयएनं आनंद तेलतुंबडे यांना अटक केली होती. तेव्हापासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात होते. नोव्हेंबर 2022 मध्ये न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जेलमधून सुटका झाली 

काय आहे प्रकरण?

31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यापैकी तेलतुंबडे हे एक होते. त्यांची भाषण ही बंदी घातलेल्या घातलेल्या माओवादी संघटनेला पाठिंबा दर्शवणारी होती. त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांचे पडसाद 1 जानेवारी 2018 रोजी उसळलेल्या दंगलीत उमटले होते. या संघटनेच्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना तेलतुंबडे उपस्थित होते. तसेच कथित माओवादी नेता आणि भाऊ मिलिंद तेलतुंबडे यांच्याही ते गुप्तपणे संपर्कात होते.

हे ही वाचा :

Kalyan News : दिवंगत पत्रकार स्वदेश मालवीय यांच्या कुटुंबीयांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मदतीचा हात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget