एक्स्प्लोर

Baba Adhav : महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक हरपला, कपिल पाटलांची पोस्ट

Kapil Patil Post On Baba Adhav : समाजवादाच्या मुद्द्यावर त्यांना तडजोड मान्य नव्हती. महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यावर त्यांची श्रद्धा होती. फुलेंच्या अखंडातल्या निर्मिकावरही.

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.

बाबा आढाव यांच्या जाण्यानं राज्याच्या सामाजिक चळवळीमध्ये निश्चितपणे एक पोकळी निर्माण झाली आहे. राज्याच्या पुरोगामी चळवळीचे हे न भरून येणारे नुकसान आहे. बाबा आढाव यांच्या निधनानंतर समाजातील विविध स्तरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. माजी आमदार आणि हिंद मजदूर किसान पंचायतचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी बाबा आढाव यांच्या कार्याचा आढावा घेणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

Kapil Patil Post On Baba Adhav : कपिल पाटील यांची सोशल मीडियावरील पोस्ट जशीच्या तशी,

महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक हरपला

कोविडची महामारी रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन होता तेव्हा. माणसं घरात. कारखाने बंद. हाताचं काम गेलेलं. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात लक्षावधी स्थलांतरित मजूर रस्त्याने चालत होते. कुणाच्या पायातून रक्त येत होतं. कुणी स्त्री हायवेवरच बाळंत होत होती. कुणी ट्रक उलटून त्यात दबून मरत होतं. पटरीवर मान ठेवून डोळा लागलेल्या मजुरांच्या मानेवरून तर मालवाहू गाडी निघून गेली. अंग मेहनत करणाऱ्या या वर्गाचे हाल पाहून शरद पवारांना कुणाची आठवण आली असेल तर ती बाबा आढावांची.

डॉ. बाबा आढावांचा 90 वा वाढदिवस 1 जून 2020 ला साजरा झाला. बाबांवर शरद पवारांनी एक मोठी फेसबुक पोस्ट लिहली. शरद पवार जितके कसलेले राजकारणी आहेत तितकेच संवेदनशील नेते आहेत. परिवर्तनाच्या चळवळीशी नातं जपणारे राजकारणी आहेत. पवार साहेबांनी लिहलं म्हणून नव्या पिढीला डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दल काही कळलं.

महात्मा फुले जेव्हा होते तेव्हा आपण कुणीच नव्हतो. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ही महाराष्ट्राची ओळख आजही आपण साऱ्यांनी जपली आहे. त्या परंपरेतला एक जीता जागता माणूस कालपर्यंत आपल्या सोबत होता.

बाबा राष्ट्र सेवा दलात घडले. महात्मा फुले अन् साने गुरुजी हे त्यांचं दैवत. साने गुरुजी हे सेवा दलाची ओळख मानली जाते आणि महाराष्ट्राची माऊली. महाराष्ट्राच्या समतेच्या चळवळीची आजच्या काळातली ओळख एकाच नावात सांगायची असेल तर ते नाव आहे, डॉ. बाबा आढाव.

डॉ. बाबा आढाव म्हणजे एक गाव, एक पाणवठा. बाबा म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा मुक्तीदाता. बाबा म्हणजे हमाल मापाड्यांचा कैवारी. बाबा म्हणजे काच पत्रा वेचणाऱ्या हातांच्या जखमा पुसणारा, हडपसरचं साने गुरुजी रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेणारा जणू डॉ. अल्बर्ट श्वाईटझर. बाबा म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पिछड्यांना हाक घालणारा लोहियावादी. बाबा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जेल भोगणारा सत्याग्रही. बाबा म्हणजे जयपूर हायकोर्टासमोर मनुचा पुतळा हटवण्यासाठी लॉंग मार्च काढणारा महाराष्ट्राचा बंडखोर. बाबा म्हणजे गोर गरिबांना परवडणारी, कष्टाची भाकर देणारा अन्नपूर्णादाता. बाबा म्हणजे असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारा जणू नारायण मेघाजी लोखंडे. बाबा म्हणजे सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे जागता ठेवणारा महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक. बाबांचं आयुष्य फुलेमय आहे. पण त्यांच्यात गांधी, आंबेडकर यांचा समन्वयही आहे.

महाराष्ट्राला 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण झाली. त्याचवर्षी डॉ. बाबा आढावांनी नव्वदी गाठली होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' द्यावा, म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहलं होतं. मुख्यमंत्री महोदय, आपण सरकार स्थापन करत असताना शिवरायांचा महाराष्ट्र, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार यांचा महाराष्ट्र असं म्हणाला होतात. ती परंपरा घट्ट करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार शासनाने द्यावा, एवढीच विनंती मी केली होती. आघाडी सरकारने दाखलही घेतली नाही, याचं दु:ख मात्र आहे.

बाबा काही पुरस्काराचे भुकेले नव्हते टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना मॅन ऑफ दी इयरचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार दिला होता. बाबांनी तो स्वीकारला होता. त्यांना आनंद होता हमालाचा घामाला दाम मिळवण्यामध्ये. त्यांना समाधान होतं, देवदासींचे अश्रू पुसण्यामध्ये.

उपाशी पोटी (न) झोपणार्‍या कष्टकर्‍यांच्या झोपडीतले उसासे ते ऐकत अन् तळमळत. गरीब घरात सरकारने शिधा देण्याची योजना मनमोहन सिंगांच्या काळात सुरू झाली. पण त्यामागे प्रयत्नांचे आंदोलन होते बाबा आढाव यांच्या सारख्यांचे. फारच थोड्यांना माहीत असेल ते.

बाबा वेशीबाहेरच्या समतेसाठी गावागावात लढत होते. तेव्हा प्रतिगामी त्यांना बाबा आढाव, झगडा बढाव म्हणत असत. मनुवादी शक्तींच्या विरोधात संघर्ष उभा करताना बाबांना किती नावं ठेवली गेली. बाबांना पर्वा नव्हती. प्रत्येक संघर्षात ते आघाडीवर असत. लोकशाही वाचवण्यासाठी आणीबाणीत ते तुरुंगात होते. धरणग्रस्तांसाठी कितीदा तुरुंगात गेले.

मराठा शेतकरी कुटुंबातला बाबांचा जन्म. पण महर्षी शिंदेंप्रमाणे बाबांनी आपलं आयुष्य दलित, शोषित, पीडितांसाठी दिलं. भटक्यांसाठी आणि देवदासींसाठी दिलं. ते अखेरपर्यंत समाजवादी होते. सत्यशोधक समाजवादी.

समाजवादाच्या मुद्द्यावर त्यांना तडजोड मान्य नव्हती. महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यावर त्यांची श्रद्धा होती. फुलेंच्या अखंडातल्या निर्मिकावरही.

बाबांची आयुष्य रेषा आज खंडित झाली आहे. पण बाबांचं काम, त्यांचा विचार, त्यांची प्रेरणा अखंड राहील. आठवणही अखंड राहील. विनम्र श्रद्धांजली !

- कपिल पाटील

अध्यक्ष, हिंद मजदूर किसान पंचायत महाराष्ट्र

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Embed widget