(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवे वर्ष, नवे कालनिर्णय...! कालनिर्णयचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण
गेली 50 वर्षे विविध उपक्रमांद्वारे कालनिर्णयने फक्त मराठी माणसावरच नव्हे तर प्रत्येक भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा उमटवला आहे.
मुंबई : कालनिर्णय दिनदर्शीकेचं यंदाचं हे 50 वे वर्ष आहे. विविध उपक्रमांद्वारे 50 वर्षे 'कालनिर्णयने मराठी माणसावरच नव्हे, तर भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा उमटवलाय. एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर कालनिर्णय दिनदर्शीका दरवर्षी असते. तसंच कालनिर्णयची वेबसाइट, अॅपही उपलब्ध आहे. कालनिर्णय हे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तमिळ आणि तेलूगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.
समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून, वेगळ्या धाटणीचा ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून नोटपॅड, छोटो मोठो ऑफिस, मीडियम, थ्री इन वन क्युबिकल, कार, डेस्क, वर्षचंद्रिका, विकली नोट प्लॅनर, पॉकेट डायरी, इअर प्लॅनर अशा विविध प्रकरातील आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत.
गेली 50 वर्षे विविध उपक्रमांद्वारे कालनिर्णयने फक्त मराठी माणसावरच नव्हे तर प्रत्येक भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. कालनिर्णय हे जगातील सर्वाधिक खपाची दिनदर्शिका आहे. कालनिर्णयला ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. पंचांग, भविष्य, सणवार, तिथी- नक्षत्रे, शास्त्रार्थ ही कालनिर्णयची प्रमुख अंगे आहेत. पंचांग सामन्यांसाठी सोपे आणि सुलभ करण्यात कालनिर्णयचा मोठा वाटा आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha