Job Majha : बँक ऑफ महाराष्ट्र, संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालय, एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?
नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालय अहमदनगर, एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी सांगली येथे काम करण्यासाठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे कराल.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
पुणे, अहमदनगर, सांगलीमध्ये नोकरीच्या संधी आहेत. पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. तर महाविद्यालयांमध्येही विविध पदांसाठी भरती होत आहे. या नोकरीच्या संधीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात.
बँक ऑफ महाराष्ट्र
पोस्ट – विशेषज्ञ अधिकारी
- एकूण जागा – 198
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- नोकरीचं ठिकाण – पुणे
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट - www.bankofmaharashtra.in
- वरील वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Recruitment process वर क्लिक केल्यावर current openings मध्ये सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. Recruitment notification वर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2021
संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालय अहमदनगर
पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक
- एकूण जागा – 48
- नोकरीचं ठिकाण – अहमदनगर
- थेट मुलाखत होणार आहे.
- अधिकृत वेबसाईट - sangamnercollege.edu.in
- या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला notices & circulars मध्ये walk in interview वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात विस्ताराने मिळेल.
- मुलाखतीचा पत्ता - एस. एन. आर्ट्स, डी. जे. मालपानी कॉमर्स अँड बी. एन. सारडा सायन्स कॉलेज, घुलेवाडी, पुणे नाशिक हायवे (एनएच – 50), संगमनेर, जिल्हा-अहमदनगर- 422 605
- मुलाखतीची तारीख – 13 सप्टेंबर 2021
एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी तासगाव, सांगली
पोस्ट - प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई
- एकूण जागा – 13
- शैक्षणिक पात्रता – अनुक्रमे M.Pharm Ph.D. आणि 10 वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे, तसंच सहाय्यक प्राध्यापकसाठी M.Pharm, व्याख्यातासाठी B.Pharm/M.Pharm, प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी D.Pharm/BSc, शिपाई पदासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता हवी.
- अधिकृत वेबसाईट - www.sahyadri charitable. Com
- अर्ज तुम्ही पोस्टानेही पाठवू शकता, तसंच मेलही करु शकता.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी, तासगाव-मणेराजुरी रोड, वसुंबे फाटा, महाराष्ट्र – 416312
- ईमेल आयडी आहे- eklavyacop@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2021