Job Majha : माझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे नोकरीची संधी
Job Majha : अनेकजण चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.
मुंबईमध्ये 1 हजार 501 जागांसाठी भरती होत आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पहिली पोस्ट – एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक
- एकूण जागा – 18
- शैक्षणिक पात्रता - NAC (AC रेफ्रिजरेशन मेकॅनिक)
दुसरी पोस्ट - कॉम्प्रेसर अटेंडंट
- एकूण जागा – 28
- शैक्षणिक पात्रता - NAC (मिल राईट मेकॅनिक/MMTM), MDL/शिपबिल्डिंग उद्योगात एक वर्षाचा अनुभव
तिसरी पोस्ट - कारपेंटर
- एकूण जागा – 50
- शैक्षणिक पात्रता - NAC (कारपेंटर/शिपराईट वूड)
चौथी पोस्ट - कम्पोजिट वेल्डर
- एकूण जागा – 183
- शैक्षणिक पात्रता - NAC (वेल्डर किंवा समतुल्य)
पोस्ट- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
- एकूण जागा – 100
- शैक्षणिक पात्रता - NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
पोस्ट - इलेक्ट्रिशियन
- एकूण जागा – 58
- शैक्षणिक पात्रता - NAC (इलेक्ट्रिशियन)
पोस्ट - गॅस कटर
- एकूण जागा – 92
- शैक्षणिक पात्रता - NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर)
पोस्ट - पेंटर
- एकूण जागा - 45
- शैक्षणिक पात्रता - NAC (पेंटर)
पोस्ट - स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर
- एकूण जागा - 344
- शैक्षणिक पात्रता - NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/फॅब्रिकेटर)
पोस्ट- ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल)
- एकूण जागा - 45
- शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा
पोस्ट - ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
- एकूण जागा - 42
- शैक्षणिक पात्रता - NAC (मेकॅनिकल)
पोस्ट - स्टोअर किपर
- एकूण जागा - 43
- शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा
पोस्ट - यूटिलिटी हँड (सेमी-स्किल्ड)
- एकूण जागा - 100
- शैक्षणिक पात्रता – NAC, शिपबिल्डिंग उद्योगात एक वर्षाचा अनुभव
विविध पदांसाठी भरती होत आहे. त्यासंबंधीची विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल.
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट - mazagondock.in
संबंधित बातम्या:
- Union Budget 2022: '60 लाख नवे रोजगार निर्माण करणार', अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
- Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार
- Share Market: बजेटला दलाल स्ट्रीटचे 'थंम्स अप'; Sensex 848 अंकांनी वधारला तर Nifty 17,500 च्या पार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha