एक्स्प्लोर

Jitendra Awhad on Ajit Pawar : अजितदादा बारामती लढणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी प्रयत्न; आता दादांच्या 'जिथं पिकतं तिथं विकत नसतं'वरून जोरदार पलटवार!

पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, राजकीय करामती केल्या तुम्ही. एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल, तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे, असे आव्हान त्यांनी दिले. 

Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवार बारामतीमधून लढणार आहेत, लोकांची मानसिकता संभ्रावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत असल्याचा पलटवार शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लोकांची सहानभूती कशी निर्माण होईल यासाठी सर्व प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्ष नेते होते. शरद पवार उच्चपदस्थ राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असं ते सगळे पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते. असे जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे, बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळे, या गैरसमजातूनच ते मागे पडले, असा टोला आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला. अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये जिथं पिकतं तिथं विकत नसतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. 

अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागते

पवार साहेब मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते हे ते मुख्यमंत्री न झाल्यामुळे अजून त्यांना कदाचित कळली नसेल. आम्ही एकनाथ शिंदे यांचा अनुभव घेत आहे, ते सुद्धा घेत आहेत. अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागते, वडीलधाऱ्या माणसाचे अपमान करणे, पाडून बोलणे, वडीलधाऱ्या माणसाची मृत्यूची इच्छा व्यक्त करणे हे लोकांना आवडत नाही पटत नाही. अजित पवार काम करत नाही का? काम करतात. मात्र, काकांना बाहेर काढावं हे लोकांना आवडत नाही. सर्व बारामतीला माहिती बॉस कोण आहे. कामाशिवाय देखील आपलं नातं असतं. कुठलीही विधानसभा ही भवितव्याची निवडणूक असते. महाराष्ट्र भवितव्य कोण देणार हे सर्वांना माहिती आहे. पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, राजकीय करामती केल्या तुम्ही. एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल, तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे, असे आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले. 

एकही माणूस त्यांच्या विरोधात ब्र सुद्धा काढत नव्हता

मी प्रामाणिकपणे सांगतो त्यांची राष्ट्रवादी पक्षामध्ये दादागिरी होती. एकही माणूस त्यांच्या विरोधात ब्र सुद्धा काढत नव्हता. उगीच तक्रार पवार साहेबांकडे गेली आपल्यावर पवार साहेब नाराज होतील. त्यामुळे कोणीच बोलायचे नाही. त्यांना आता इथं पवार साहेब नाहीत. त्यामुळे कोण कोणाला घाबरत नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावरून आव्हाड  यांनी प्रतिक्रिया दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Babanrao Taywade on Manoj Jarange Patil: तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget