साताऱ्याच्या रायफल-शंभूनं जिंकला 1BHK फ्लॅट!
सांगलीच्या कासेगाव मध्ये 1 बीएचके फ्लॅटच्या पहिल्या बक्षिसासाठी जयंत केसरी बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न. सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने जयंत केसरी 'किताब पटकावत जिंकला 1 बीएचके फ्लॅट

Sangli News : सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यत संपन्न झाली. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीत सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत वन बीएचके फ्लॅट जिंकला आहे. माजी मंत्री जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद लाहीगडे फाउंडेशनच्यावतीने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. वीस एकर माळरानावर पार पडलेल्या या भव्य बैलगाडी शर्यतीसाठी चक्क वन बीएचके फ्लॅटसह लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये प्रदेश येथून सुमारे अडीचशेपेक्षा अधिक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली होती. अत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये सातारच्या वाई येथील सचिन शेठ यांच्या रायफल व खटावच्या कळंबी येथील अधिक पैलवान यांच्या शंभू या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत वन बीएचके फ्लॅट जिंकला. या विजेत्या बैलगाडी चालकांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आलं. स्पर्धा पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शर्यत प्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावली होती. जयंत पाटील यांनी ट्वीटवरुन विजेत्यांचं अभिनंदन केलेय. हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचा आंनद लुटला, असे जयंत पाटील यांनी म्हटलेय.
आज कासेगाव येथे माझ्या वाढदिवसानिमित्त श्री. अतुल लाहिगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. प्रथम क्रमांकाच्या बैलगाडीस संयोजकांनी वन बीएचके फ्लॅट हा बक्षीस म्हणून दिला. हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचा आंनद लुटला. pic.twitter.com/rugM51q012
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 18, 2024
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या पोस्टरमधून पक्ष सोडलेल्यांना टोला
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगलीमध्ये ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पोस्टरमधून पक्ष सोडलेल्यांना टोला देखील लावण्यात आलाय. यामध्ये 'इथे ना चालते दादागिरी, ना चालते गद्दारी, इथले निष्ठावंतच लय भारी' अशा वाक्यामधून जयंत पाटलांना एकीकडे शुभेच्छा देत शरद पवार आणि जयंत पाटील गटाची साथ सोडल्यांना टोमणा मारण्यात आलाय. याशिवाय 'टायगर अभी जिंदा है' अशा आशयाचेही पोस्टर जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरात ठीकठिकाणी लागले आहेत. राष्ट्रवादी मधील बंडानंतर जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा चेंज करताना शक्तिप्रदर्शन करत यामध्ये पक्षातून बाहेर पडल्याने आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
आणखी वाचा :
राम लहर संपली! आता रामनाम सत्य है!, संजय राऊतांची अशोक चव्हणांसह भाजपवर ‘रोखठोक’ टीका!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
