एक्स्प्लोर

Jayakwadi dam: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे महिनाभरात दुसऱ्यांदा उघडले, गोदापात्रात विसर्ग सुरु

Jayakwadi Dam: आता अवघ्या पंधरा दिवसांनी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Jayakwadi Dam: गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानं मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण आता तुडुंब भरले आहे. बुधवारी संध्याकाळी जायकवाडी धरणाचे महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यानंतर गोदापात्रात 9432 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. जायकवाडी धरण 99.78 % ने भरले आहे. जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने 9 सप्टेंबरला एकूण सहा गेट अर्धा फुटाणे उघडले होते. त्याच दिवशी सायंकाळी विसर्गात वाढ करण्यात आली होती व एकूण 12 दरवाजांमधून विसर्ग सुरू होता. 10 सप्टेंबरला पुन्हा सहा गेट उघडण्यात आले व एकूण 18 गेटमधून 9432 क्युसेक विसर्ग गोदापत्रात सुरू होता. 

आता अवघ्या पंधरा दिवसांनी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 13 सप्टेंबरला बंद केलेले हे दरवाजे बुधवारी पहाटे उघडण्यात आले असून या दरवाजातून 94321 गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. 

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

जायकवाडी प्रशासनाने बुधवारी पाच वाजता 2096 क्यूसेकने विसर्गात वाढ केली होती. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला असून एकूण 11528 क्युसेकने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरसह हजारो गावांची तहान जायकवाडीच्या पाण्याने भागते. याशिवाय औष्णिक वीज प्रकल्पाला तसेच शेती सिंचन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे.  बुधवारी आधी सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सहा दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला. यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 

किती भरले जायकवाडी धरण?

जायकवाडी धरण 99.78 टक्क्यांनी भरले असून जायकवाडीत पाण्याची पातळी 1521 फुटांवर गेली आहे. धरणाच्या वरील भागात तसेच पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. दरम्यान बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहा दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला होता.

कोणत्या भागांना पावसाचा अलर्ट?

मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  नांदेडमध्ये मध्यम सरींचा अंदाज असून लातूरधाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

दोन दिवसातील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ

मागील दोन दिवसात झालेल्या पावसानं मराठवाड्यातील धरणपातळीत वाढ झाली असून जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मराठवाड्यातील बहुतांश धरणे आता भरण्याच्या मार्गावर असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:

Rain Alert: मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट, शुक्रवारपासून पाऊस ओसरणार, हवामान विभागानं दिला अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget