एक्स्प्लोर

दाभोलकर-पानसरे-कलबुर्गींचे खुनी कोण?, 'अंनिस'ची '#JawabDo' मोहीम

विवेकवाद्यांचे मारेकरी कधी पकडले जाणार, असा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या सोशल मीडिया विभागाने ‘#JawabDo’ मोहीम सुरु केली आहे.

मुंबई : डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तींची हत्या होऊन मोठा कालावधी लोटल्यानंतरही तापसयंत्रणा मारेकरी आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे मारेकरी कधी पकडले जाणार, असा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या सोशल मीडिया विभागाने ‘#JawabDo’ मोहीम सुरु केली आहे. विवेकवाद्यांचे मारेकरी मोकाटच! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट 2017 रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अद्यापही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडले नाहीत. त्याचबरोबर कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पुरोगामी विचारवंत प्रा. एम. कलबुर्गी यांचे खुनीही मोकाटच आहेत. ‘#JawabDo’ मोहीम काय आहे? 20 ऑगस्ट 2017 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण होतील. या दिवशी महाराष्ट्र अंनिसकडून सोशल मीडियातून मोठी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेतून विवेकवाद्यांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल सरकारला जाब विचारला जाणार आहे. #JawabDo या हॅशटॅगचा वापर करत, 20 ऑगस्ट 2017 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सरकारला जाब विचारला जाणार आहे. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गींचे खुनी कोण?, 'अंनिस'ची '#JawabDo' मोहीम देशभरातून मोहिमेला पाठिंबा विशेष म्हणजे, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी या विवेकवाद्यांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल सरकारला जाब विचारणारी ही मोहीम महाराष्ट्र अंनिससोबतच कर्नाटकातूनही ‘आय अॅम कलबुर्गी’ पेजमार्फतही राबवली जात आहे. केरळ आणि पंजाबमधील विवेकवाद्यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. अंनिसचं आवाहन
“20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या दरम्यान #JawabDo हे ट्रेंड कॅम्पेन होणार असून यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. सोशल मीडियावर जाब विचारल्यावर तरी शासनाला जाग येईल, अशी आशा आहे.”, असे ‘अंनिस’च्या सोशल मीडिया विभागाचे राज्य कार्यवाह विनायक होगाडे हे एबीपी माझा वेब टीमशी बोलताना म्हणाले.
विविध क्षेत्रातील दिग्गजांचा मोहिमेला पाठिंबा अंनिसच्या या #JawabDo मोहिमेला विविध क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळताना दिसतो आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुभाष वारे यांसारख्या दिग्गजांनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवत फेसबुक-ट्विटरवर हॅशटॅग वापरत पोस्ट केल्या आहेत. #JawabDo मोहिमेतील काही निवडक पोस्ट : https://twitter.com/anjali_damania/status/898824399738068992 https://twitter.com/sonalikulkarni/status/898912955995181056 https://twitter.com/HogadeVinayak/status/888544250597699587
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget