एक्स्प्लोर

Jalna : जालन्यातील चांदईमध्ये संचारबंदी लागू, सर्च ऑपरेशन जारी, सरपंचासह 18 जण अटकेत

Jalna Chandai News : जालन्यातील चांदई गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. 

जालना: जिल्ह्यातील चांदई गावांमध्ये काल झालेल्या दगडफेकीनंतर या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या तीन प्रकरणात 250 जणांवर  गुन्हे दाखल केले असून सरपंचासह 18 जणांना अटक करण्यात आलीय. पोलिसांचे सर्च ऑपरेशन अद्याप जारी आहे. 

गुरुवारी झालेल्या दगडफेकीमध्ये पाच ते सहा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. तर सात शासकीय वाहनांची जमावाने तोडफोड केली होती. संचारबंदी जाहीर केल्यानंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.

काय आहे घटना?
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये गुरुवारी दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली होती. गावातील कमानीला नाव देण्यावरुन हा वाद पेटला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. जमावाने केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झालेत. या दगडफेकीत पोलिसांची व्हॅन, जीपसह अग्निशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच आणि उपसरपंचासह 18  जणांना अटक केलीय. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे काल पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून गावातील सरपंच आणि उपसरपंच सह पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं आहे. काल झालेल्या दगडफेकीमध्ये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला होता. दगडफेकीत पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले असून सहा सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 

चांदई गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या कमानीला नाव देण्यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. दरम्यान गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी अनधिकृतपणे उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवला असून ती कमान देखील काढण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.  या प्रकरणी प्रभारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, गावात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

कालच्या पोलिसांवरील दगडफेक प्रकरणातील 250 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सरपंच आणि उपसारपंचांसह 18 जण अटकेत आहेत. पोलिसांकडून दगड मारणाऱ्यांचा शोध सुरूच असून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्याचा आरोपींचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.  एबीपी माझाच्या हाती लागलेल्या या व्हिडीओमध्ये काही युवक दगड हातात घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. तसेच समोरुन पोलिस व्हॅन येण्याची वाट पाहत ते रस्त्याच्या कडेला उभे दिसत असून जशी पोलिस व्हॅन समोर येते त्यावेळी हे युवक त्या व्हॅनवर दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. दगडफेक होत असल्याचं दिसताच पोलिसांनी ती व्हॅन न थांबवता तिथून पुढं नेल्याचं दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget