Jalgaon News : मदतीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्याचा मृतदेह दूध संघाच्या आवारात फेकण्याचा प्रयत्न, पोलिसांचा नातेवाईकांवर सौम्य लाठीचार्ज
जळगावातील दूध संघातील कंत्राटी कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्युनंतर कुटुंबाला मदत मिळण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि युनियनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह आवारात फेकण्याचा प्रयत्न केला.
जळगाव : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळण्याच्या मागणीसाठी त्यांचा मृतदेह दूध संघाच्या आवारात फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यात ही घटना घडली. मृत धनराज सोनार हा जळगाव दूध विकास संघात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. शुक्रवारी पहाटे दूध टँकर आणि ट्रकच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. यातील मृत धनराज सोनार यांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत आणि परिवारातील सदस्याला कायमस्वरुपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी दूध संघाबाहेर मृत धनराज सोनार यांचा मृतदेह आणून ठेवला होता. यांना ळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील घोदस ळल्याने खळबळ उडाली आहे
मुक्ताईनगर तालुक्यात घोदस गावात शुक्रवारी (13 मे) पहाटे दूध टँकर आणि ट्रकचा अपघात झाला. यात धनराज सोनार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मदतीबाबत दूध संघासोबत सुरु असलेली बोलणी यशवी होत नसल्याचं लक्षात आल्यावर नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी मृत धनराज सोनार यांचा मृतदेह दूध संघाच्या आवारत गेटमधून फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यंनी त्यांनाही न जुमानता मृतदेह दूध संघाच्या अवारात नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन जमाव पांगवला आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
गेल्या 20 वर्षांपासून धनराज सोनार हे जळगाव दूध विकास संघात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले आणि आई आहे. धनराज यांच्या अपघाती मृत्युमुळे आधारच हरपल्याने कुटुंबाचं काय होणार असा प्रश्न कुटुंबियांसमोर उभा राहिला. त्यामुळे दूध संघाकडून 50 लाख रुपये आणि कायमस्वरुपी नोकरी मिळावी, या मागणी साठी सोनार कुटुंबाने दूध विकास संघाच्या समोर मृतदेह आणून आपली मागणी लावून धरली होती. मात्र दूध संघ प्रशासनासोबत बोलणी यशस्वी होत नसल्याचं लक्षात येताच नातेवाईक आणि संघातील युनियन कर्मचारी यांच्यातील रोष वाढला. याच वेळी काही कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत मयत धनराज यांचा मृतदेह दूध संघाच्या बंद गेट तोडून आत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दूध संघाच्या युनियनचे कर्मचारी आणि पोलीस यांच्यात झडप झाली. दूध विकास युनियनच्या कर्मचारी संख्या जास्त असल्याने आणि ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने पोलिसांनी दिसेल त्याला चोप देण्यास सुरुवात केली, पोलिसांनी मयत धनराज सोनार यांच्या काही नातेवाईकांनाही चोप दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या दुःखात असताना मृतदेह फेकण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. मात्र आमच्या मागणासाठी मृतदेह दूध संघात आणल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. मदती मिळावी या आपल्या भूमिकेवर नातेवाईक अद्यापही ठाम आहेत.
मृत धनराज सोनार यांच्या कुटुंबास मदत देण्यासंदर्भात काही गोष्टी दूध संघ अधिकारी मान्य करत असले तरी प्रत्यक्ष मदत कधी मिळेल याबाबत कोणतंही ठोस आश्वासन देत नव्हते किंवा लेखी स्वरुपात द्यायलाही तयार नसल्याने नातेवाईक आणि कर्मचारी यांचा रोष वाढला. याच वेळी काहींनी गेटवर लाथा मारुन राग व्यक्त करण्यात सुरुवात केली आणि मृतदेह आत नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अचानक लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. मात्र मृतदेह फेकला नाही किंवा फेकण्याचा प्रयत्नही केला नसल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे.