पगार द्या, मगच गाडी काढा! जळगावमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अधिष्ठातांना घेराव
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यांपासून थकला आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या गाडीला घेराव घालून आंदोलन केलं.
Jalgaon : जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यांपासून थकला आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या गाडीला घेराव घालून आंदोलन केलं. एका खासगी कंपनीमार्फत कार्यरत वर्ग 3 आणि 4 चे 200 हून अधिक कर्मचारी गेल्या 11 महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. सुरुवातीला पगार वेळेवर मिळत होता, मात्र आता दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
दसऱ्यांच्या आदल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अधिष्ठातांना थेट जाब विचारला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. ठाकूर यांनी तातडीने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संध्याकाळपर्यंत पगार खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सणासुदीच्या काळातही पगार वेळेवर मिळत नसल्याने ठेकेदारी पद्धतीतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिष्ठातांची गाडी अडवून आंदोलन केले, यावेळी लवकरच पगार देणार असल्याचे आश्वासन अधिष्ठातांनी दिले आहे. सणासुदीतही वेतन रखडल्यानं कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:























