एक्स्प्लोर
जळगाव निवडणूक निकाल : 40 वर्षांनी सुरेश जैन यांची सद्दी संपली!
जळगाव महापालिका निवडणूक निकाल 2018 : जळगावकरांचा कौल कोणाला याचा निकाल आज जाहीर होणार आहे.
जळगाव : जळगाव महापालिकेचा निवडणूक निकाल 2018 आज जाहीर झाला आहे. तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचं वर्चस्व संपलं आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला 15 आणि एमआयएमला 3 जागांवरच यश मिळवता आलं आहे.
मूलभूत सोयीसुविधांचा अभाव हे सत्तापालटाचं एक प्रमुख कारण समजलं जात आहे. दरम्यान, पराभव मान्य असून आत्मचिंतन करु, अशी प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी दिली आहे. तर भाजपच्या विकासाच्या मॉडेलला मत मिळाल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
LIVE UPDATE
- जळगाव निवडणूक निकाल : 75 जागांचे कल हाती, भाजप 57 जागांवर पुढे तर शिवसेना 14 आणि इतर 4 जागी आघाडीवर
- जळगाव निवडणूक निकाल : भाजप 34, शिवसेना 23 आणि इतर एका जागी आघाडीवर
- भाजपला 30, शिवसेनेला 22 जागांवर आघाडी
- भाजप 11, शिवसेना 7 जागी आघाडीवर
- भाजपला 7, शिवसेनेला 6 जागांवर आघाडी
- जळगाव निवडणूक निकाल : भाजप 3, शिवसेना 6 जागा
- अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नसल्याने मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांची निदर्शनं
- भाजप 3 आणि शिवसेनेला दोन जागांवर आघाडी
- पहिले कल हाती, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागांवर आघाडी
- पोस्टल मतमोजणीला सुरुवात, पहिले कल काही क्षणात हाती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement