एक्स्प्लोर

भाजपला धक्का, जळगाव मनपावर भगवा, सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shiv Sena vs BJP in Jalgaon : जळगावमध्ये शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दोन दिवसांत भाजपच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Shiv Sena vs BJP in Jalgaon : जळगावमध्ये शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दोन दिवसांत भाजपच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगरसेवक तर गेलेच त्यात भर म्हणून जळगाव मनपामध्ये शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे. 

शनिवारी  जळगाव मनपामध्ये भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारीच चार नगरसेवकांन भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. दोन दिवसात भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.  शनिवारी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. भाजप बंडखोर, एमआयएमसह असे 42 जणांचे संख्याबळ शिवसेनेकडे झाले आहे. जळगाव मनपामध्ये 75 जागा आहेत. संख्याबळ पुरेसे असल्यामुळे शिवसेनेने जळगाव मनपावर झेंडा फडकावला आहे. 

मागील काळात भाजपाला बहुमत मिळाले होते, मात्र आघाडी सरकार आल्यापासून सुत्रे फिरली आहेत. राज्यातील सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अनेक भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण काही दिवसानंतर त्यांची पुन्हा घरवापसी झाली होती. त्यामुळे जळगाव मनपामध्ये महापौर शिवसेनेचा आणि बहुमत भाजपचे अशी परिस्थिती झाली होती.  पण आता पुन्हा एकदा शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ झाले आहे. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप हा विकासकामांना विरोध करत असल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. 

जळगाव मनपामध्ये भाजपने सुरेश जैन यांच्या खानदेश विकास आघाडीची सत्ता उलथविण्याचा यश मिळविले होते. 75 पैकी 57 जागावर स्पष्ट बहुमत मिळवित भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला होता.  
 
मात्र नंतर चे काळात राज्यात भाजपा आणि सेनेचे युतीची सत्ता गेल्यावर जळगाव शहराच्या विकास कडे भाजप चे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने सेनेने जनतेची नाराजी ओळखत भाजपचे काही नगर सेवक आपल्या गळाला लाऊन जळगाव मनपा वर भगवा फडकवला होता,मात्र मधल्या काळात पुन्हा भाजपा ने सेनेचे काही नगर सेवक आपल्या कडे वळविण्यात आल्याने जळगाव मनपा वर सेनेचा महापौर तर भाजप चे बहुमत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर अनेक भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सेनेचे 22, भाजपा बंडखोर 24, एमआयएम 3, भाजपा 31असे संख्या बळ झाले आहे. 

जळगाव मनपामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना यश मिळाले आहे, तर भाजपा सह गिरीश महाजन यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaAmit Shah Maharashtra Vidhan Sabha : विधानसभेसाठी अमित शाहांचं 'मिशन महाराष्ट्र' जागावाटपाबाबत लवकरच दिल्लीत बैठकABP Majha Headlines : 07 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHC on Mumbai Police : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Latur : आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
Embed widget