एक्स्प्लोर

Jalgaon Dudh Sangh : एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग, जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व, महाजन ठरले किंगमेकर 

Jalgaon Dudh Sangh Elections Result : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटानं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना हा धक्का मानला जात आहे.

Jalgaon Dudh Sangh Elections Result : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Elections) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे. खडसेंचं वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं (BJP-Shinde group) विजय मिळवला आहे. एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे (Manda Khadse) यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा  मिळाल्या आहेत.

भाजप-शिंदे गटाकडून विजयाचा जल्लोष 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवारांनी मुसंडी मारली आहे. 20 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे.

विरोधकांनी खोक्याची ताकद लावून निवडणूक जिंकली, खडसेंचा आरोप

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव मान्य केला आहे. विरोधकांनी खोक्याची ताकद लावली आहे. त्यापर्यंत आम्ही गेलो नाही. आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात होती रस्सीखेच 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होते. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली होती त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या गटाचा पराभव करत भाजप आणि शिंदे गटाने विजय मिळवला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Eknath Khadse : खडसेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, पत्नी मंदा खडसेंचा पराभव, भाजप-शिंदे गटाची विजयाकडे वाटचाल 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balaji Kinikar: युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
Gokul Politics Over Debenture: 'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
Maharashtra Rain Today: पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Mandir Video Call Delivery: लोकलमध्ये महिलेला प्रसूती वेदना, व्हिडीओ कॉलवर सुखरूप प्रसूती
Thane Polls : ठाण्यात इच्छुकांच्या शिबिराच 70 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार
Voter List Scam : मतदार यादीत लाखोंचा घोळ, सत्ताधारी आमदाराचाच गंभीर आरोप
Solapur Protest : मुख्यमंत्र्यांच्या टीकेमुळे काँग्रेस आक्रमक, सोलापुरात आंदोलन
Salim Khan Meet Raj Thackeray : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balaji Kinikar: युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
Gokul Politics Over Debenture: 'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
Maharashtra Rain Today: पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
Pune News: केंद्रीय संरक्षण मंत्री अन् मुख्यमंत्री ज्या मंचावर बसणार तिथं सापाचा शिरकाव; पाहुणे येण्यापूर्वी यंत्रणा अडचणीत, नेमकं काय घडलं?
केंद्रीय संरक्षण मंत्री अन् मुख्यमंत्री ज्या मंचावर बसणार तिथं सापाचा शिरकाव; पाहुणे येण्यापूर्वी यंत्रणा अडचणीत, नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि रशियानंतर भारताचे हवाई दल सर्वात शक्तिशाली; चीनला मागे टाकलं, पाकिस्तान कितव्या नंबरवर?
अमेरिका आणि रशियानंतर भारताचे हवाई दल सर्वात शक्तिशाली; चीनला मागे टाकलं, पाकिस्तान कितव्या नंबरवर?
Donald Trump on India: डोनाल्ड ट्रम्प दिवसागणिक सुट्टी देईनात; आता म्हणाले, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींचे आश्वासन! राहुल गांधींचा मोदी घाबरले म्हणत बोचरा वार
डोनाल्ड ट्रम्प दिवसागणिक सुट्टी देईनात; आता म्हणाले, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींचे आश्वासन! राहुल गांधींचा मोदी घाबरले म्हणत बोचरा वार
Manikrao Kokate brother Bharat Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार; सिन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार; सिन्नरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
Embed widget