एक्स्प्लोर
Ram Mandir Video Call Delivery: लोकलमध्ये महिलेला प्रसूती वेदना, व्हिडीओ कॉलवर सुखरूप प्रसूती
मुंबईतील राम मंदिर (Ram Mandir) रेल्वे स्थानकावर धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. कॅमेरामन विकास बेद्रे (Vikas Bedre) यांनी डॉक्टर देविका देशमुख (Dr. Devika Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉलवर ही प्रसूती केली. 'मी खूप घाबरलो होतो, पण मॅडमने व्हिडिओ कॉलद्वारे मला मदत केली,' असे विकास बेद्रे यांनी नंतर सांगितले. रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास गोरेगाव स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरु झाल्याने विकासने प्रसंगावधान दाखवत ट्रेनची चेन खेचली. राम मंदिर स्थानकात कोणतीही तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध नसल्याने, विकास यांनी डॉ. देशमुख यांना व्हिडीओ कॉल केला. डॉक्टरांच्या सूचनेनुसार चहावाल्याकडून कात्री आणि लायटरसारखे साहित्य जमवून, विकासने यशस्वीरित्या प्रसूती पार पाडली. या घटनेनंतर आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















