एक्स्प्लोर

Gokul Politics Over Debenture: 'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा

Gokul Politics Over Debenture: गोकुळ दूध संघात डिबेंचर कपात प्रकरणावर शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; 40 टक्के डिंबेचर कपातीविरोधात उत्पादकांचा पोलिसांशी संघर्ष.

Gokul Politics Over Debenture: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’मधील प्राथमिक दूध संस्थांना डिबेंचरच्या (Gokul debenture issue) स्वरूपात दिल्या जाणाऱ्या रकमेत 40 टक्के कपातीचा आरोप करत कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्राथमिक दूध संस्थांच्या उत्पादकांनी जनावरे कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या मोर्चाचे नेतृत्व महाडिक गटाच्या संचालिका शैोमिका महाडिक यांनी केले. शौमिका महाडिक यांनी डिबेंचर मुद्यावरून गोकुळ अध्यक्षांनी माहिती दिली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी गोकुळ प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

उत्पादकांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांचा नारा  

मोर्चेकऱ्यांनी जनावरे गोकुळ कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार झटापट झाली. जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. आंदोलकांनी 'जय श्रीराम' आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या की, अध्यक्षांनी उत्तर देणं संयुक्तिक वाटेल. कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते काय निर्णय घेणार आहेत, त्यांना त्याचं गांभीर्य आहे का? गेल्या चार वर्षांमध्ये शासनाचा जो लेखा परिक्षण अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो.

'गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केली' (Gokul controversy 2025)

शौमिका महाडिक म्हणाल्या की, गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाही. गोकुळचे व्यवस्थापकीय संचालक फक्त तांत्रिक गोष्टी सांगत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यापेक्षा मला असं वाटतं की चार प्रतिनिधींना बोलवून सुवर्णमध्य प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी काढणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम 40 टक्के कट केली म्हणजे गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दिवाळी तोंडावर आहे. त्यांना जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडून चांगलं होईल. त्यांच्या फक्त दोनच मागण्या आहेत बाकी काही नाही. आतापर्यंत 10 टक्के रक्कम कट केली जात होती, असे शौमिका महाडिक यांनी म्हटलं आहे.

डॉ. योगेश गोडबोले यांना घेराव घालत विचारणा 

दुसरीकडे, गोकुळकडून प्राथमिक दूध संस्थांना डिबेंचर स्वरूपात याही वर्षी रक्कम देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत 40 टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप दूध संस्थांनी केला आहे. या मुद्यावरून आजच्या मोर्चापूर्वी शौमिका महाडिक यांच्यासह संस्था प्रतिनिधींनी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना घेराव घालत विचारणा केली होती. संस्था प्रतिनिधींकडून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. 

गोकुळचा 'डिबेंचर' (कर्जरोखे) मुद्दा आहे तरी काय? 

गोकुळचा कारभार, टँकर, संचालकांची मौज, वासाचं दूध आदी मुद्यावरून गोकुळचा कारभार कायम चर्चेत राहिला असला, तरी डिबेंचर मुद्दा पहिल्यांदाच चर्चेत आला आहे. गोकुळकडून गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ही कपात केली जात आहे. प्राथमिक दूध संस्थांना बळकटी देण्यासाठी ‘गोकुळ’ने नफ्यातील शिल्लक रक्कम डिबेंचर म्हणून संस्थांच्या नावे टाकण्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्षांसह संचालकांनी घेतला होता. ही रक्कम नफ्यावर निश्चित केली जाते. चालू वर्षात मिळालेला नफा विचारात घेत 72 कोटी रुपये संस्थांच्या नावे वर्ग करण्यात आली. यामध्ये गायी म्हशीच्या दूधाचा फरक, डिबेंचर व्याज, दूध दर फरकावरील व्याज व लाभांश आदी रक्कम संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. मात्र, डिबेंचरमध्ये कपात अधिक केल्याचा मुद्दा प्राथमिक दूध संस्थांकडून करण्यात आला. ‘गोकुळकडून दूध दर फरकासह इतर तरतुदी केल्यानंतर शिल्लक नफा संस्थांना डिबेंचर रुपात म्हणून दिला जातो. दूध संस्थांचे पैसे संघाकडे शिल्लक राहिले तरी वर्षाला त्यावर व्याज दिले जाते. 

संस्था प्रतिनिधींकडून गोकुळ कार्यालयासमोर उपोषण 

दुसरीकडे,डिबेंचर स्वरूपात कपात केलेली 40 टक्के रक्कम प्राथमिक दूध संस्थांना परत करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींनी कोल्हापुरातील कार्यालयासमोर गोकुळ समोर उपोषण केले होते. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोतीराम घोडके, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, चंद्रशेखर मस्के, बाबासाहेब गोसावी, पांडुरंग मगदूम, अनिल कुरणे, अनिल जाधव यांच्यासह संस्था प्रतिनिधी सहभागी झाले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget