एक्स्प्लोर
Voter List Scam : मतदार यादीत लाखोंचा घोळ, सत्ताधारी आमदाराचाच गंभीर आरोप
बुलढाणा (Buldhana) मतदार संघातील मतदार यादीतील (Voter List) घोळावरून सत्ताधारी शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी सरकारवर आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. 'निवडणूक आयोग म्हणतंय की बोगस नावं काढू नका', असा खळबळजनक दावा गायकवाड यांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार असून, यामध्ये पंधरा वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तींची आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अजूनही मतदार यादीत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुबार नावे असलेल्या चार हजार मतदारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, असे गायकवाड म्हणाले. एका सत्ताधारी आमदारानेच थेट निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























