एक्स्प्लोर

Irshalwadi Landslide : अतिशय खडतर वाट पायाखाली तुडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनास्थळी, परिस्थितीचा घेतला आढावा

Khalapur Irshalwadi Landslide : खालापूर येथील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 80 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Irshalvadi Landslide : रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झालं. अतिशय कठीण वाट पायाखाली तुडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दरड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. रायगडमधील चौक मानवली येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून 30 ते 40 घरं गाडली गेली. आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून 100 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकर्स पॉईंट असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध कलावंतीण दुर्गच्या शेजारीच असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळली. येथे जाण्याची वाट अतिशय कठीण आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दुर्घटना स्थळी स्वत: पायी जाण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री शिंदेंचा दुर्घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्थानिक नागरिकांना   केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी काही तरुण स्वतःहून पुढे आले आहेत. रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी मध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच नागरिकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहून 10 कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत.''

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी 50 कंटेनरची व्यवस्था करण्यात येत असून या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtra Landslide : इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला, किती मिमी बरसला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
Embed widget