एक्स्प्लोर

कुठेही पळा, अटक करणारच : IG विश्वास नांगरे- पाटील

आरोपी पळून पळून कुठे पळतील?, कुठेही पळाले तरी त्यांना अटक करणारच, असा थेट इशारा विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.

सातारा: राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे पुन्हा आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत. कारण गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात दोन्ही राजे अर्थात खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी, नांगरे-पाटील यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आनेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरुन राडा झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरु आहे. कुठेही पळा, अटक करणारच! प्रत्येकाचा गुन्ह्यातील सहभाग पाहून कठोर कारवाई करु, मग तो कोणीही असो कायदा सर्वांना समान आहे, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. इतकंच नाही तर या राड्यात सहभागी असणारे आरोपी पळून पळून कुठे पळतील?, कुठेही पळाले तरी त्यांना अटक करणारच, असा थेट इशारा नांगरे पाटील यांनी दिला. पोलीसांचं कौतुक यावेळी नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचं आणि सातारा पोलिसांचं कौतुक केलं. “घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस दुपारपासून अलर्ट होते. एसपी संदीप पाटील हे वायरलेसवरुन सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते. पण मध्यरात्री असा प्रकार घडेल असा अंदाज नव्हता, पण तरीही पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली” असं नांगरे पाटील म्हणाले. 13 जणांना अटक, अनेक जण रुग्णालयात दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनीही थर्ड पार्टी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. घटनेदिवशी फायरिंग झालं असून दोन पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे, तर या राड्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ते गुपचूपपणे उपचार घेत आहे. मात्र पोलीस त्यांचा शोध घेऊन, त्यांना अटक करतील, असंही नांगरे पाटील यांनी सांगितलं. काय आहे आनेवाडी राडा प्रकरण? आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गुरुवारी मध्यरात्री चांगलाच राडा झाला. दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री होऊन, अनेक वाहनांची तोडफोड झाली. इतकंच नाही तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गोळीबार झाल्यामुळे वाद चिघळला. खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांनी उदयनराजे समर्थकांच्या सात गाड्या फोडल्या. संबंधित बातमी शिवेंद्रराजेंच्या घरात घुसण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न, मध्यरात्री राडा  ...तर उदयनराजेंना अटक करु: विश्वास नांगरे-पाटील

.. तर याद राखा, उदयनराजेंचा आणेवाडी टोल प्रशासनाला इशारा

पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report On Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीवेळी आईचं नाव का घेतलं?Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 December 2024 माझा गाव माझा जिल्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget