एक्स्प्लोर

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, मुख्य प्रवाहाबाहेर पाठवणी

अवघ्या महिन्याभरातच तुकाराम मुंढेंची ट्रान्सफर करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची 22 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईत बदली झाली आहे.

नाशिक : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवण्यात आलं आहे. तुकाराम मुंढेंची एड्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे. अवघ्या महिन्याभरातच तुकाराम मुंढेंची ट्रान्सफर करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची 22 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईत बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाचं सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली होती. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती. गेल्या बारा वर्षात बदली होण्याची तेरावी वेळ आहे. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णयही रद्द करणात आले आहेत. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्याकडून प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले.

नियुक्ती... वाद आणि बदली

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली सीईओ म्हणून नियुक्ती, त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं. नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली. पुण्यातून नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिकमध्ये गेल्यावर त्यांनी केलेली करवाढ अवास्तव असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला होता. नाशकात नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले. कालिका मंदिरात आरती होताच, तुकाराम मुंढे यांनी सर्व प्रसाद स्टॉल्सची अचानक पाहणी केली. संध्याकाळपर्यंत प्लास्टिक वापर बंद न केल्यास, दुकाने हटवू असा इशारा यावेळी मुंढेंनी दिला. इतकंच नाही तर मंदिराबाहेरील रस्त्यावर दुकानांनी अतिक्रमण केल्यास कारवाईचाही इशारा दिला. तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 12 बदल्या महापालिका आयुक्त, सोलापूर (2006-07) प्रकल्प अधिकारी, धारणी (2007) उपजिल्हाधिकारी, नांदेड (2008) सीईओ, नागपूर जिल्हा परिषद (2008) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नाशिक (2009) के. व्ही. आय. सी. मुंबई (2010) जिल्हाधिकारी, जालना (2011) जिल्हाधिकारी, सोलापूर (2011-12) विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई (2012) आयुक्त, नवी मुंबई महापालिका (2016) पीएमपीएमएल, पुणे (2017) नाशिक महापालिका आयुक्त (2018) मुंबई नियोजन विभाग सहसचिव (नोव्हेंबर 2018) एड्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालक (डिसेंबर 2018)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget