Palghar: पालघरमधील स्त्रीशक्ती संस्थेत महिला दिन उत्साहात साजरा
महिला दिनाचे औचित्य साधून पालघरमधील स्त्रीशक्ती संस्थेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पालघर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांचा सन्मान व्हावा म्हणून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. स्त्रीशक्ती संस्था देशातील सहा राज्यात कार्यरत असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत असलेल्या एकोणतीस आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृह आतून भोजन पुरवठा करते.
जव्हार मधील विनवळ येथे हे स्वयंपाकगृह असून या मध्यवर्ती स्वयंपाकगृहमध्ये महिलांना रोजगार मिळावा म्हणून स्त्री शक्तीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून याठिकाणी उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील महिलांना जागृतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या प्रतिनिधी तृप्ती केदारे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या व्यवस्थापिका सुवर्णा पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिलांनी आनंदाने सहभाग घेऊन पारंपारिक नृत्य ठेका धरला.
संबंधित बातम्या:
- International Women’s Day: अकोल्यात 'महिलाराज'; जिल्हा प्रशासनाची दोरी सावित्रीच्या लेकींच्या हाती, 20 प्रमुख पदांवर महिला
- In Pics : Women's Day Special : 'या' आहेत भारताच्या सर्वात श्रीमंत महिला, त्यांची संपत्ती किती?
- Womens Day 2022 : PM मोदींचे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्तीला सलाम! म्हणाले....
- Womens Day 2022 : महिला झाल्या आत्मनिर्भर! अगरबत्ती उद्योगातून दोनशे महिलांना रोजगार