Womens Day 2022 : महिला झाल्या आत्मनिर्भर! अगरबत्ती उद्योगातून दोनशे महिलांना रोजगार
Womens Day 2022 : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील महिला अगरबत्ती उद्योगातून आत्मनिर्भर झाल्या आहेत.
Womens Day 2022 : महिलांनी एखादे ध्येय गाठण्यासाठी पाऊल उचलले तर काय होऊ शकते हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी दाखवून दिले आहे. माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या पुढाकाराने बचत गटाच्या महिलांनी अगरबत्तीचा उद्योग सुरू केला. नामांकित ब्रँड असल्याने या उद्योगाने अल्पावधीतच भरारी घेतली. या उद्योगामुळे 200 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
दिग्रस तालुक्यात आणि शहरात कोणत्याही प्रकारचा मोठा उद्योग नसल्याने महिलांना शेती आणि इतर उन्हातील कामे करावी लागत होती. त्यांना नियमित रोजगार देखील मिळत नव्हता, अशा वेळी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड वनमंत्री असताना वनविभाग, बांबू विकास महामंडळ यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकित ब्रँड कंपनीसोबत करार करण्यात आला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने एक कोटी 67 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून शंभर मशीनची खरेदी करण्यात आली. यावेळी पाचशे महिलांना रोजगार मिळावा, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सुरुवातील 20 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. यवतमाळ अगरबत्ती प्रकल्प हा दिग्रस येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू आहे. या दरम्यान, दोनशे ते अडीचशे महिलांना नियमित रोजगार मिळत असून, दिवसाला एका महिलेला अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिदिन मिळतात. त्यामुळे या महिला स्वकर्तुत्वातून आत्मनिर्भर झाल्या आहेत.
नामांकित ब्रँड ही कंपनी कच्चा माल पुरवठा करते. त्यावर महिला प्रक्रिया करून अगरबत्ती बनवतात. हा उद्योग यवतमाळ जिल्ह्यात इतर ठिकाणी सुरू करण्यासाठी आमदार संजय राठोड यांचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Womens Day 2022 : एक गाव असाही, जिथे सगळी पदं महिलांकडे..वाचा संपूर्ण माहिती
- Womens Day 2022 : RTO कडून पहिलाच प्रयोग, महाराष्ट्रात सावित्री पथकाची स्थापना
- Womens Day Google Doodle : महिलांना समर्पित आजचे खास गुगल डूडल, महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha