एक्स्प्लोर

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अकोला, जळगाव जिल्हा दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोना संसर्गावर कुठलीही लस उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय सांगितला जात आहे. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्हा दौऱ्यातचं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

अकोला/जळगाव : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर सध्यातरी कुठलीही लस उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टन्सिग हाच उपाय सांगितला जात आहे. मात्र, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्हा दौऱ्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तर, आज त्यांनी अकोला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, दोन्ही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नावापुरतेच पाहायला मिळाले. अशाने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली. मात्र, जनतेला सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहन करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना स्वत:च ते पाळण्याचं भान राहिलं नाही. या बैठकीत अधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार यांची मोठी गर्दी झाली आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. MMR क्षेत्रात प्रवासासाठी आता पासची गरज नाही, सरकारकडून काही नियमात बदल जळगावातही आरोग्य मंत्री टोपे यांना भेटायला गर्दी जळगाव जिल्ह्यातील वाढती कोरोनाच्या बाधितांची संख्या आणि वाढत्या मृत्यू दराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे बुधवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि आमदार खासदार यांच्यासोबत त्यांनी आढावा बैठकीच आयोजन केले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी त्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले. यावेळी निवेदनाचा अक्षरशः पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचे निदर्शनास आले. जळगाव येथे कोरोना विषाणूबाबत घेतली आढावा जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करुन त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल 24 तासांत प्राप्त होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. Health Minister on #Corona 'या महामारीला न घाबरता त्यासोबत जगण्याचं कौशल्य प्राप्त करा '- राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget