एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Konkan Refinery Project: रिफायनरी प्रकल्पाला कोयना धरणातील पाणी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत काय झालं? सामंत यांनी स्पष्टच सांगितले

Konkan Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी कोयना धरणातील पाणी वापरण्यात येणार असून स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Konkan Refinery Project: बारसू येथील रिफायनरी प्रकल्पासाठी(Kokan Refinery Project) शेतकऱ्यांवर स्थानिकांवर कोणताही दबाव टाकला जाणार नसल्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रकल्पासाठी अर्जुना धरणातील पाणी न वापरता कोयना धरणातील पाणी वापरण्यात येणार असून बारसूपर्यंत पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. 

कोकणातील प्रस्तावित बारसू रिफायनरीबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात आज लोकप्रतिनिधींची  बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे आणि उद्योग खात्यातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी माहिती दिली. 

उदय सामंत यांनी सांगितले की, रिफायनरी कशाप्रकारे होणार आहे, याची माहिती देण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. रिफायनरी प्रकल्पासाठी 6200 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी 2900 एकर जमीन मालकांनी संमतीपत्रे दिली आहेत. उर्वरित जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. नाटेसाखरमध्ये क्रूड ऑईलचा साठा तयार होणार आहे. त्याठिकाणी बोअर खोदण्याचे काम झाले आहे. तर, इतर काही ठिकाणी काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक होणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष रोजगार 3000 जणांना उपलब्ध होणार आहे. तर, 75000 अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. 

रिफायनरीसाठी अर्जुना धरणातून पाणी घेतल्यास कोकणात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचा मुद्दा आमदार राजन साळवी यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या मुद्याचा गांभीर्याने विचार करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी घेण्यासाठी तत्वत: मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. ही पाईपलाइन ज्या गावातून जाईल त्या गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्याची पाणीपट्टी ग्रामपंचायतीला भरावी लागणार आहे. बारसूपर्यंत पाईपलाईन येणार आहे. प्रकल्पासाठी 160 एमएलडी पाणी आवश्यकता लागणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. 

या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहे. भुवनेश्वरमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मतदारसंघात असलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर हे केंद्र असणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. रिफायनरी परिसरात हिरवळ राहण्यासाठी झाडे लावण्यात येणार आहे. मात्र,  ही झाडे कोकणात आढळणारी झाडे असणार आहे. यामध्ये काजू, आंबा आदी झाडांचा समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जमिनीला अधिक चांगला दर मिळाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास रिफायनरीच्या पाठिंब्याचा पुनर्विचार करू असे आमदार राजन साळवी यांनी म्हटले असल्याचेही सामंत यांनी सांगितले. राजन साळवी यांनी प्रकल्पाबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत असल्याचे सामंत यांनी सांगितले. हा मोठा प्रकल्प साळवी यांच्या मतदारसंघात येत असल्याने त्यांच्या सूचनाही लक्षात घेण्यात आल्याची माहितीदेखील सामंत यांनी दिली. आमदारांप्रमाणे जनतेनेदेखील सकारात्मक भूमिका घ्यावी,  असे आवाहन त्यांनी केले. 

जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू, शेतकऱ्यांवर स्थानिकांवर कोणताही दबाव टाकून प्रकल्प पूर्ण करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. रिफायनरीविरोधकांनासोबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले. 

रिफायनरीवरून ठाकरे गटात मतभेद?

या रिफायनरीला आमदार राजन साळवींचं समर्थन असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले. आजच्या बैठकीला राजन साळवी यांनी उपस्थितीदेखील दर्शवली. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे ठाकरे गटात रिफायनरीच्या मुद्यावरून मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget