एक्स्प्लोर

Ratnagiri News : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने पुढील दोन महिने महत्त्वाचे

Ratnagiri News :कोकणातल्या रिफायनरच्या दृष्टीने पुढील आठवडा महत्त्वाचासौदीचे राजा भारत भेटीवर; थेट पंतप्रधान मोदींची करणार चर्चाफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2023 मध्ये करणार भारत दौरा

Ratnagiri News : राज्यातले उद्योग एका मागून एक बाहेर जात आहेत. या पार्श्वभूमीवरती देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने पुढील दोन महिने हे महत्त्वाचे असणार आहेत. कारण पुढील आठवड्यात सौदी अरेबियाचे राजा भारत भेटीवर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजा यांच्यामध्ये रिफायनरीबाबत (Refinery) चर्चा होणार का? आणि झाल्यास ती सकारात्मक असणार का? याकडे निश्चितच सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. करण रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरी प्रस्तावित आहे. सध्या तिथल्या विरोधामुळे रिफायनरीचं ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण थांबलेलं आहे. तर यापूर्वी नाणार इथला रिफायनरी रद्द करण्यात आलेला आहे. शिवाय मधल्या काही काळामध्ये मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती जवळपास साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प अद्यापही पुढे सरकताना दिसून येत नाही. राज्य सरकार प्रकल्पबाबत सकारात्मक आहे. कोकणात होणाऱ्या रिफायनरीमध्ये  सौदी अरेबियातील आरामको ही कंपनी यामध्ये सर्वात मोठी गुंतवणूकदार असणार आहे आणि या सर्व घडामोडी घडत असताना सौदीचे राजा भारत भेटीवर येत आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान रिफायनरी प्रकल्पबाबत चर्चा होणार का? तसेच चर्चा झाल्यास निर्णय काय असणार? याची सध्या सर्वांना उत्सुकता आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2023 मध्ये करणार भारत दौरा
तर दुसरीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जैसे थे अवस्थेत आहे. मागच्या दहा-पंधरा वर्षांमध्ये ज्या ठिकाणी प्रकल्पाचं कोणतंही काम झालेलं नाही. अशा वेळेला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2023 मध्ये भारत भेटीवर येणार आहेत. त्यामुळे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर चर्चा होणार का? त्याचं काय फलित असणार? रखडलेले प्रकल्पाचे काम पुढे जाण्यासाठी काय तोडगा निघणार किंवा तो काढला जाणार? याबाबत निर्णयाकडे देखील जिथे सर्वांचं लक्ष असणार आहे.

सौदीचे राजा आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांची भारतभेट महत्त्वाची का?
कोकणातील रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प मोठे आणि महत्त्वाचे आहेत. रिफायनरी प्रकल्पातून आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रमध्ये होणार आहे. साधारण लाख ते दीड लाख रोजगार निर्मितीचा दावा केला जात आहे. पण स्थानिकांचा विरोध असल्याने या प्रकल्पाचे काम अद्यापही पुढे सरकलेलं नाही. साधारण 2016-17 मध्ये प्रकल्पाची घोषणा झाली. पण 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती झाली आणि नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यानंतर बारसू आणि सोलगाव या ठिकाणी  प्रकल्पाची चाचपणी करण्यात आली. पण प्रकल्पाच्या सुरुवातीला केले जाणारे माती आणि ड्रोन परीक्षण स्थानिकांनी रोखलं. त्यानंतर इथला विरोध अधिक प्रकर्षाने पुढे आला. या ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी देखील प्रकल्पाच्या विरोधात ठराव केले आहेत. काही प्रमाणात या ठिकाणी प्रकल्पाला समर्थन देखील आहे. शिवाय राज्य सरकार देखील प्रकल्पबाबत सकारात्मक आहेत. कोकणातीलच असलेले उद्योगमंत्री उदय सामंत प्रकल्प व्हावा यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. अशा सर्व घडामोडी रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पबाबत होत असताना  यांची भारत भेट या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget