देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली, एक हजार पुरुषांमागे 1020 महिला
Sex Ratio At Birth: भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाला यश लाभत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येतं.
Women & Men Sex Ratio In India: देशात महिला आणि पुरुषांच्या प्रमाणात महत्वाची बातमी आहे. देशात प्रथमच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झालीय. 1990 च्या दशकात एक हजार पुरुषांमागे 927 महिला होत्या. तर ताज्या आकडेवारीनुसार एक हजार पुरुषांमागे देशात 1020 महिला आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली.
भारतात महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2015-16 साली 919 वरून 2019-20 साली 929 झाली आहे. 24 नोव्हेंबर 2021 ला भारताने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसंख्या,प्रजनन दर आणि बाल स्वास्थ्य, परिवार कल्याण, पोषण आणि इतर आरोग्यविषयी क्षेत्रातील सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NFHS-5 च्या सर्व्हेनुसार 88.6% मुलांचा जन्म हा रुग्णालयात झाला आहे. अधिकाऱ्यांनी NFHS-4 (78.9%) च्या तुलनेत ही मोठी सुधारणा आहे. भारत हॉस्पिटलॉइज्ड बर्थमध्ये युनिव्हर्सल स्टेजच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतात प्रजनन दर काही प्रमाणात घटल्यानं लोकसंख्या स्थिर होण्याची चिन्हं आहेत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार शहरी भागात प्रजनन दर 1.6 टक्के इतका आहे तर ग्रामीण भागात तो 2.1 टक्के इतका आहे. भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाला यश लाभत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येतं. 2015-16मध्ये प्रति महिला मुलांचं प्रमाण सरासरी 2.2 इतकं होतं, ते कमी होऊन आता दोनवर आलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :