एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ 1 कोटीचा दरोडा घालणारे मोकाटच

इतक्या हायप्रोफाईल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही अशी चोरी होणं हे कशाचं लक्षण आहे? ज्यांच्याकडे गृहखात्याचा भार आहे... त्यांच्याच भागातल्या गुन्हेगारीचा दर वाढला आहे

नागपूर : नागपूर... गुन्ह्यांची राजधानी... असा एकही दिवस नाही... जेव्हा नागपूरमध्ये काही अघटित घडलं नाही...  रविवारचीच गोष्ट... ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर धरमपेठमध्ये पराग परांजपेंच्या घरातून 108 तोळे सोन्यांसकट 1 कोटींचा मुद्देमाल लंपास झाला... महत्त्वाचं म्हणजे जोराने हाक मारली... तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकू जाईल इतकं जवळ घर... आता इतक्या हायप्रोफाईल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही अशी चोरी होणं हे कशाचं लक्षण आहे? ज्यांच्याकडे गृहखात्याचा भार आहे... त्यांच्याच भागातल्या गुन्हेगारीचा दर वाढला आहे... नागपूर तर देशातली दुसरी क्राईम सिटी झाली आहे. नागपुरात धरमपेठ भागातील गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या आहेत 9 ऑक्टोबर 2012 - वसंतराव नाईक झोपडपट्टीतल्या लोकांनी गुंडावर कारवाई न झाल्याने त्याला ठेचून ठार केलं. 25 फेब्रुवारी 2013- शंकरनगरमध्ये हेमंत दियेवार या भाजप कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या 1 एप्रिल 2013- लाहौरी बारमध्ये सुमित गाडगे या 24 वर्षीय तरुणाची भोसकून हत्या 29 सप्टेंबर 2016- गोकुलपेठ बाजारात गँगवॉर होऊन सचिन सोनकुसरे या गुन्हेगाराची 10 गोळ्या झाडून हत्या 21 नोव्हेंबर 2016- क्लाऊड सेवन बारमध्ये आमदार पुत्र आणि वेटर्समध्ये हाणामारी होऊन शुभम महाकाळकर या युवकाची हत्या आता या सगळ्या घटना विरोधकांच्या नजरेत भरल्या नसत्या तरच नवल. नागपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरभर फिरणारा मोस्ट वॉन्टेड पप्पू यादव पोलिसांना सापडत नाही. गेल्याच आठवड्यात नागपुरात आलेल्या पोलिस महासंचालकांनी पप्पू यादवच्या मुद्द्यावरुन नागपूर पोलिसांचे वाभाडेच काढले. पप्पू यादव तुम्हाला सापडत नसेल, तर सांगा मुंबई पोलिस शोधून देतील, असं ते माथुर म्हणाले. गृहखाते कायम मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असेल, तर प्रशासकीयदृष्ट्या बरं असतं, अशी नेहमी पळवाट दिली जाते. पण खरंच मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रालयाचा भार अती होत असेल, तर तो कमी करावा. अन्यथा नागपूरमध्ये माजलेली अराजकता तरी थांबवावी.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget