एक्स्प्लोर

केवळ 17 दिवसात राज्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

दर दिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची 11,300 थाळींची संख्या आता 14,639 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात या योजनेअंतर्गत 139 शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. 11 फेब्रुवारी 2020 रोजी योजनेच्या अंमलबजावणीला 17 दिवस पुर्ण झाले. या 17 दिवसांच्या काळात राज्यात तब्बल 2 लाख 33 हजार 738 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याचे दिसून आले आहे. प्रजासत्तादिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे 2 फेब्रुवारी 2020 पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक (1 लाख 5 हजार 887) झाली होती. आता 11 फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे. शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. दर दिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची 11,300 थाळींची संख्या आता 14,639 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात या योजनेअंतर्गत 139 शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहे. Special Report | पुण्यात शिवभोजनला उदंड प्रतिसाद, मार्केट यार्डातील केंद्रावर लांबच लांब रांगा | ABP Majha   लाभार्थ्यांना फक्त 10 रुपयात थाळी शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या भोजनालयात प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येते. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत असतात. ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येते. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान आहे. संबंधित बातम्या : शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, प्रजासत्ताक दिनी शुभारंभ! शिवसेनेत हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा एकटी लढवावी, चंद्रकांत पाटलांचे आव्हान
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
Horoscope Today 7 September 2025: आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
Horoscope Today 7 September 2025: आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
Bihar Election : बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
Beed News: मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आलीय; मला सांगायला लाज वाटते बीड जिल्ह्यात पोलिसांना स्वतःचं....; धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आलीय; मला सांगायला लाज वाटते बीड जिल्ह्यात पोलिसांना स्वतःचं....; धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
SBI खातेदारांसाठी मोठी अपडेट, उद्या 'या' वेळेत ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही, बँकेनं कारण सांगितलं
SBI खातेदारांसाठी मोठी अपडेट, उद्या 'या' वेळेत ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही, बँकेनं कारण सांगितलं
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
Embed widget