एक्स्प्लोर

मुंबई-ठाण्यात 'देवाभाऊ'चे बॅनर झळकले, मराठा आरक्षणावर भाजपचे कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही

Devendra Fadnavis Banner : मुंबई आणि ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले असून छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपने आता देवेंद्र फडणवीसांचे कँपेन सुरू केल्याचं दिसून येतंय. मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे 'देवाभाऊ' असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचसोबत वृत्तपत्रांमध्येही तशा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यावर एकनाथ शिंदेंनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिली. आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही असं शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत राज्य शासनाने तीन महत्त्वाचे जीआर काढले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा उपसमितीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला. यावर मनोज जरांगे यांनीही समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले.

मुंबई-ठाण्यात भाजपची बॅनरबाजी

मराठी आरक्षणासंबंधी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई आणि ठाण्यात देवाभाऊ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.

यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना फोटो दिसतो. या बॅनरवर फक्त 'देवाभाऊ' एवढाच उल्लेख करण्यात आला आहे. तर राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही देवाभाऊ असा उल्लेख असलेल्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्याचं दिसत आहे.

'कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस' असा बॅनरवर मजकूर लिहण्यात आला आहे. 'छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार. ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा, देवाभाऊ....' असंही बॅनरवर लिहलं आहे.

हे बॅनर नेमके कुणी लावलेत हे कळू शकलेलं नाही. मात्र, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत तीन जीआर काढल्यानंतर भाजपने ही बॅनरबाजी केल्याची चर्चा आहे.

आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही

मुंबई आणि ठाण्यात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागल्यानंतर त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, दोघांनाही न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे. अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत मिळाली आहे. आता देवेंद्रजी आणि आम्ही, एक टीम म्हणून काम सुरू केलं आहे. यापुढे असंच वेगाने काम आम्ही करणार आहोत. सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे."

ही बातमीव वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget