एक्स्प्लोर

शिवसेनेत हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा एकटी लढवावी, चंद्रकांत पाटलांचे आव्हान

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खुर्चीतून पडता-पडता वाचले. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना हा प्रकार घडला. खुर्चीचा पाय तुटल्याने चंद्रकांत दादांना आपला तोल सावरता आला नाही. जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी चंद्रकांत दादांना लगेचच सावरलं.

सोलापूर : शिवसेनेत हिंमत असेल तर पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली तर शिवसेनेने निवडणुक एकटी लढवून दाखवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा देखील साधला.

दिल्ली निवडणुकांवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून मधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, आप मतलबी कोण हे जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा कळेलच. सूर्यावर थुंकण्याला काही अर्थ आहे. तर दिल्ली निवडणुकांबद्दल देखील चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जणू काय आपण जिंकल्याचा अविर्भावात शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला 0.2% आणि 0.1% मते मिळाली असून भाजपला मात्र 6 टक्के मते जास्त मिळाली असल्याचे पाटील म्हणाले. देशाचं अहित झालं तरी चालेल मात्र भाजप जिंकता कामा नये असे सध्या राजकारण सुरू आहे. जसं काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि यांच्यामुळे अरविंद केजरीवाल जिंकले अशा अविर्भावमध्ये बोलत असून दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्मला म्हणून पेढे वाटण्या सारखं काम हे करत असल्याची टीका असल्याची चंद्रकांत पाटील यांनी केली. Minister Bungalow | मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी, सर्वाधिक खर्च थोरात आणि भुजबळांच्या बंगल्यावर | ABP Majha

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत मांडलेल्या खासगी विधयेकवर देखील चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं. अनिल देसाई यांनी विधयेक मंडण्याआधी उद्धव ठाकरे यांना विचारलं आहे का? आणि कॉंग्रेसने मुस्लिम लोकांना विचारलं का? आणि जर त्यांनी याला परवानगी दिली असेल तर शिवसेनेने आमच्या सोबत दगा केला असेल तरी आम्ही कौतुक करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाल्यानंतर हिंदू संघटित करावं, भारतीय नागरिकत्व, समान नागरिक कायदा असे विषय होते. समान नागरी कायदा तयार होण्यास असे विधेयक मदत करेल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केलं. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 बंगल्यांसाठी 15 कोटींचा खर्च होत असल्याच्या बतमीवरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. आपण ज्या बंगल्यात पाच वर्षे राहिलो त्यात एकदाही साधी रंगरंगोटी देखील केली नाही. बंगल्याची अवस्था चांगलीच होती. सार्वजनिक पैशांचा हा अपव्यय असून काल पर्यंत आम्ही देखील याच बंगल्यात राहिलो आहोत. बेसुमार खर्च करून काय उपयोग, बंगले दुरुस्त होण्याआधी हे सरकार पडेल अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्या फक्त अफवा असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
..आणि चंद्रकांत दादांची खुर्ची मोडली! सोलापुरात आयोजित या पत्रकार परिषदेदरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खुर्चीवरून पडता पडता वाचले. पत्रकार परिषद सुरू असताना खुर्चीचा अचानक पाय तुटल्याने चंद्रकांत पाटलांचा तोल गेला. मात्र शेजारी बसलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सावरलं. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद सुरू होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार या मुळे उघडकीस आला संबंधित बातम्या :  मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटींचा खर्च Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget