Horoscope Today 7 September 2025: आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 7 September 2025: आजचा रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 7 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 7 सप्टेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. आज भाद्रपद पौर्णिमा आणि चंद्रग्रहण असल्याने हा दिवस असून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कामे पूर्ण करायची असतील तर, इतरांची मदत घेतल्याशिवाय त्याला पूर्तता येणार नाही
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज नेहमीपेक्षा थकवा जास्त जाणवेल. अशावेळी घरातील लोकांसाठी वेळ दिलात, तर तुम्हालाही थोडा उत्साह येईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज मनावरचा ताण दूर होईल, घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज जवळचे नातेवाईक भेटतील, आयुष्याच्या जोडीदार मिळण्याची संधी मिळेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना कलेमध्ये उत्तम प्राविण्य मिळेल, तुमच्या तडफदार स्वभावाला सखोल चिंतनाची शक्ती सौम्य स्वरूप देईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत कराल, तुमच्यातील नवीन कल्पना जन्म घेतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज बौद्धिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करू शकाल, फक्त हे करताना तुमच्या धडाडीला अविचाराचे स्वरूप येत नाही ना याकडे लक्ष द्यावे लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमची मानसिक घडण नाजूक असू शकते, त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहण्याचा धीर तुम्हाला धरावा लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तुम्ही आत्ता जे पेरणार आहात ते पुढे उगवणार आहे हे लक्षात ठेवा, नोकरीत सतत तणावाखाली राहून काम करण्याचा कंटाळा येईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज काही गोष्टींकडे जाणून-बुजून दुर्लक्ष कराल, मुलांच्या बाबतीत कडक धोरण अवलंबाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यापारात सरळ राहून फारसे काही मिळत नाही, असे वाटल्याने चाकोरी बाहेरच्या मार्ग स्वीकारण्याची तयारी ठेवाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज अपेक्षित पैसे लांबल्यामुळे थोडी धावपळ करावी लागेल, प्रसिद्धी माध्यमे तुमचा पत्ता शोधत येतील.
हेही वाचा :
Ganesh Visarjan 2025: अनंत चतुर्दशीपासून 'या' 5 राशींनी निर्धास्त व्हा! बाप्पा जाता जाता प्रिय राशींवर करणार मोठी कृपा, टेन्शन मिटणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















